सातारा : महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पैशाचा प्रचंड वापर झाल्याने या निवडणुकीने संसदीय लोकशाही धोक्यात आलेली आहे. भारतीय संविधान धोक्यात आलेले आहे. या निवडणूकांचे निकाल अत्यंत धक्कादायक असून राज्यकर्यांनी सत्तेचा गैरवापर केला आहे, त्यामुळे महाराष्ट्रात मंत्रिमंडळ न स्थापता तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी आग्रही मागणी ज्येष्ठ विचारवंत पद्मश्री लक्ष्मण माने यानी केली आहे. शिवाय यासाठी त्यांनी कराडच्या प्रितीसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करून उपोषण आंदोलनही छेडले.
दरम्यान उपोषणाच्या संदर्भाने बोलताना उपराकार लक्ष्मण माने म्हणाले की, निवडणूक आयोग, न्यायालय, प्रशासन या सर्वांना हाताशी धरून भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षाने कटकारस्थान केले आहे. त्यामुळे त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर विजय मिळवता आला आहे. वास्तविक त्यांचा हा विजय नाही तर हे पाशवी बहुमत आहे. हा जनतेचा कौल नाही. हा जनादेश नाही तर धनादेश आहे. सुमारे सातशे कोटी रुपयांचा मुद्देमाल निवडणूक आयोगानेच पकडला आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे पैशांचे वाटप करत असताना रंगेहाथ पकडले गेले. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता निवडणूक आयोग शांत बसले. थोडक्यात भारतीय जनता पक्षाने हा खोटा - लबाडीचा विजय मिळवला आहे. पोलिसांच्या संरक्षणात कंटेनर भरून गुजरात मधून पैसे आणून महाराष्ट्राची खरेदी विक्री झाली असेल तर याची न्यायालयाने निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमून तात्काळ चौकशी करावी. तोपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती यांची राजवट लागू करावी. शिवाय निवडून आलेल्या प्रतिधींना व मंत्रिमंडळाला शपथविधी घेऊ देऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान या महत्त्वपूर्ण मागणी संदर्भात शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली असल्याचे उपराकार यांनी सांगितले. या उपोषणस्थळी रामभाऊ जाधव, राजेंद्र भोसले, रवी गायकवाड, मच्छिंद्र जाधव, बजरंग भोसले यांच्यासह भटक्या विमुक्त जमाती संघटनांच्या पदाधिकार्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या आंदोलनास पाठबळ दिले.
गळफास घेवून युवकाची आत्महत्या |
संविधानाचा आधुनिक राष्ट्र निर्मितीचा संकल्प साकारण्याचे आव्हान : अन्वर राजन |
सातारा एसटी स्टँड परिसरातील बंद टपऱ्या हटवल्या |
जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपदाचा मान कोणाकोणाला ? |
सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
वृद्ध महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
सातारा स्थानिक गुन्हे शाखेची पिस्टलची शतकी कारवाई |
पेरलेत झाडे तोडताना नियमांना 'फाटा' |