सातारा : सहयाद्री वाचवा मोहिमेतंर्गत सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी झाडानी प्रकरण उघडकीस आणले होते.या प्रकरणाने महाराष्ट्र, गुजरात राज्यासह देशात खळबळ माजली होती. या प्रकरणी तातडीने कार्यवाही होत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली होती. त्यात जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, या दोघांची अन्य जिल्हयात जमीन असल्याने महाराष्ट्र कमाल जमीन धारणा कायदा 1961 चे कलम 14 नुसार त्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा स्तरावर नसल्याने या दोघांबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठवला गेला. त्यानुसार अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. त्यानुसार २६ नोव्हेंबर रोजी जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, श्रीमती संगीता चंद्रकांत वळवी, आरमान चंद्रकांत वळवी, आदित्य चंद्रकांत वळवी यांना योग्य कागदपत्रासह उपस्थित राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
सहयाद्री वाचवा मोहिमेतंर्गत माहिती अधिकार, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील तब्बल ६२० एकर जमीन जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाईकांनी बळकावल्याचे कागदपत्रांवरुन उघडकीस आणले होते. याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम १९६१ कलम १२,१३ नुसार निश्चित केलेल्या जमीन धारणेची कमाल मर्यादापेक्षा जास्त जमीन धारण केल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, पियूष बोगीरवार यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांना नोटीसा काढून कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार याप्रकरणी तीन-चार सुनावणी झाल्यानंतर त्यात जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी,अनिल वसावे, यांच्याकडे साता-यासह , नंदूरबार जिल्हयात जमीन असल्याचे कागदपत्रांवर स्पष्ट झाले होते. सातारा, नंदूरबार हे दुसऱ्या महसूल विभागात येत असल्याने त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हा स्तरावर घेण्याची तरतूद नाही. त्यामुळे शासन नियमानुसार याबाबत काय करायचे याचा प्रस्ताव शासनाकडे अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्याकडे पाठवला गेला होता. त्यानंतर ६ नोव्हेंबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांची याप्रकरणी चौकशी, सुनावणीसाठी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, श्रीमती संगीता चंद्रकांत वळवी, आरमान चंद्रकांत वळवी, आदित्य चंद्रकांत वळवी यांना चौकशीकामी बुधवार दि.२६ रोजी सकाळी ११.३० वाजता अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या सुनावणीस येताना तक्रार अर्जाच्या अनुषंगाने सातारा जिल्हयात तसेच इतर जिल्हयात किंवा इतर राज्यात धारण करत असलेले शेतजमिनीचे सात बारा उतारा, खरेदी दस्त, फेरफार व इतर आवश्यक त्या कागदपत्रासह आपले लेखी म्हणणे घेऊन उपस्थित रहावे. या सुनावणीस गैरहजर राहिल्यस किंवा आवश्यक ते कागदपत्रे सादर न केल्यास आपणास काही एक सांगावयाचे नाही असे गृहीत धरुन महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा)अधिनियम १९६१ नुसार व प्रचलित नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असे नोटीशीत बजावण्यात आले