04:48pm | Sep 27, 2024 |
नवी दिल्ली : काश्मीर मुद्यावर काही मुस्लिम देश नेहमी पाकिस्तानला साथ देत आले आहेत. अशाच देशांपैकी एका राष्ट्राने यावेळी संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) काश्मीर प्रश्नी मौन बाळगलं. 2019 नंतर पहिल्यांदा त्यांनी यूएनजीएमध्ये काश्मीर मुद्यावर बोलण टाळलं. भारताने 2019 मध्ये काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं अनुच्छेद 370 हटवलं. त्यानंतर संयुक्त राष्ट्र महासभेत टर्कीचे राष्ट्रपती तैय्यप एर्दोगन सातत्याने जम्मू-काश्मीर मुद्यावरुन भारतावर टीका करत होते. पण यावेळी UNGA मध्ये बोलताना त्यांनी काश्मीर मुद्यावर मौन बाळगणं पसंत केलं. मागची अनेक वर्ष संयुक्त राष्ट्रात वार्षिक संबोधनात एर्दोगन काश्मीर मुद्याचा उल्लेख करायचे. पण यावेळी त्यांनी काश्मीरवर बोलणं टाळलं.
एर्दोगन यावेळी काश्मीरवर एक शब्दही बोलले नाहीत. एर्दोगन यांचं मौन म्हणजे एकप्रकारे भारताचा कुटनितीक विजय म्हणून पाहिलं जात आहे. न्यूयॉर्कमध्ये 79 व्या संयुक्त राष्ट्र महासभेत भाषणा दरम्यान ते म्हणाले की, “आम्हाला ब्रिक्स देशांसोबत आमचे संबंध विकसित करायचे आहेत. यामध्ये उदयोन्मुख अर्थव्यवस्था एकत्र येतात” टर्कीला ब्रिक्सचा भाग बनायच आहे. त्यावेळी एर्दोगन यांनी काश्मीर प्रश्नी सूचक मौन बाळगलय.
ब्रिक्सचे पाच संस्थापक सदस्य देश कोण?
टर्कीला ब्रिक्समध्ये सहभागी व्हायचं आहे. भारत ब्रिक्सचा संस्थापक सदस्य आहे. पुढच्या महिन्यात रशियाच्या कजानमध्ये शिखर सम्मेलन होणार आहे. त्यात एर्दोगन सहभागी होऊ शकतात. ब्रिक्सचे पाच संस्थापक सदस्य आहेत. यात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे देश आहेत. ब्रिक्सने मागच्यावर्षी समूह विस्ताराचा निर्णय घेतला. इजिप्त, इथियोपिया, इराण आणि संयुक्त अरब अमीरात (UAE) हे देश 1 जानेवरी 2024 पासून ब्रिक्सचे सदस्य बनले. 22 ते 24 ऑक्टोंबरला रशियाच्या कजानमध्ये ब्रिक्स नेत्यांच शिखर सम्मेलन होणार आहे.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |