सातारा : छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सातारा येथे "प्रकल्प प्रदर्शनी, शिक्षक सत्कार व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम" जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आणि पाय जॅम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास अनीस नायकवाडी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे राजेश खेडेकर मॅनेजर, योगेश गुरधाळकर, राजेय निकम, महेश तोत्रे, शंकर संगम, सतीश भोसले, आदेश नांदवीकर, अक्षय कुलकर्णी, शिक्षक प्रशिक्षक उपस्थित होते.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) सातारा, जिल्हा परिषद सातारा, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आणि पाय जॅम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मूलभूत संगणक प्रशिक्षण कार्यक्रम (२०२३-२४ व २०२४-२५) राबविण्यात आला. याच अनुषंगाने 'प्रकल्प प्रदर्शनी, शिक्षक सत्कार व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम' यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमाद्वारे शाळांमध्ये मूलभूत संगणक व कोडिंग शिक्षण प्रभावीपणे राबवणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
सातारा जिल्ह्यातील ६२ शाळांमधील १२० विदयार्थी यांनी २९ व्या शतकातील कौशल्यांवर आधारित ६९ प्रकल्प सादर केले. "मूलभूत संगणक व कोडिंग प्रशिक्षण" हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या ८६ शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. उन्हाळी शिबिरात ऑफलाईन व ऑनलाइन सहभागी झालेल्या ४२ विद्यार्थ्यांना ही गौरविण्यात आले.