संशयास्पद मालमत्ता जवळ बाळगल्या प्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 05 June 2025


सातारा : संशयास्पद मालमत्ता जवळ बाळगल्या प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 3 रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अजंठा चौक, सातारा येथे प्रल्हाद शिवाजी पवार रा. गोपाळ वस्ती, अजंठा चौक, सातारा याच्या जवळ पंचवीस हजार रुपये किंमतीचे पाच वेगवेगळ्या सुट्ट्या भागात असलेले एका हिरो होंडा कंपनी च्या स्प्लेंडर मोटरसायकलचे पार्ट मिळून आले. त्याबाबत त्याला विचारणा केली असता त्याला समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार सावंत करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खुनासह पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा
पुढील बातमी
75 हजारांची लाच स्विकारताना मंडलाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

संबंधित बातम्या