कर्ज मिळवून देण्याचे आमिषाने महिलेची फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक; महाबळेश्वर पोलिसांची कामगिरी

by Team Satara Today | published on : 03 May 2026


महाबळेश्वर : सातारा ते महाबळेश्वर या मार्गावर एसटी बसने प्रवास करणाऱ्या एका महिलेची ‌‘कर्ज मिळवून देतो‌’ असे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या सतीश शामराव बोऱहाणे उर्फ संदीप या चोरट्यास पुणे खराडी येथून अटक केली आहे. महाबळेश्वर पोलिसांनी  तांत्रिक तपास, गोपनीय माहिती व समन्वय यांचा प्रभावी वापर करत आरोपीला पुण्यातून अटक केली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुजाता सूर्यकांत देवरुखकर (वय 32, रा. नरवन, ता. महाड, जि. रायगड) या .28 एप्रिल रोजी दुपारी 3.30 ते सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सातारा ते महाबळेश्वर असा एसटी बसने प्रवास करत होत्या. यावेळी संदीप नावाच्या सुमारे 45 वर्षीय संशयिताने त्यांच्याशी ओळख करुन घेत ‌‘लोन मिळवून देतो‌’ असे आमिष दाखवत विश्वास संपादन केला.

प्रवासादरम्यान संशयिताने पाण्यातून गुंगीकारक द्रव्य देऊन महिलेला बेशुद्ध केले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सुमारे 1 लाख 40 हजार रुपये किंमतीचे दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र तसेच 25 हजार रुपये किंमतीचा व्हीओ कंपनीचा निळ्या रंगाचा मोबाईल असा एकूण 1 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. घडलेल्या प्रकाराची तक्रार संबंधित महिलेने महाबळेश्वर पोलिस ठाण्यात दाखल केली होती. 

याचा तपास करत असताना महाबळेश्वर पोलिसांनी  तांत्रिक तपास, गोपनीय माहिती व समन्वय यांचा प्रभावी वापर करत आरोपी सतीश शामराव बोऱहाणे उर्फ संदीप पुण्यातून अटक केली. पुढील तपास पोनि बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि एम. बी. परजणे करत आहेत.

घटनेचा प्रकार: 

कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक आणि गुंगीचे औषध देऊन लूट.फिर्यादी महिला : सुजाता सूर्यकांत देवरुखकर (वय ३२, रा. नरवन, ता. महाड, जि. रायगड).आरोपी : संदीप नावाचा अंदाजे ४५ वर्षीय व्यक्ती.फसवणुकीचे स्वरूप: २८ एप्रिल २०२६ रोजी पीडित महिला सातारा ते महाबळेश्वर असा प्रवास करत असताना आरोपीने त्यांच्याशी ओळख वाढवली. त्याने 'लोन मिळवून देतो' असे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला.कार्यपद्धती: प्रवासादरम्यान आरोपीने पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध दिल्याने महिला बेशुद्ध झाली. या संधीचा फायदा घेऊन आरोपीने त्यांच्याकडील सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आणि तिथून पळ काढला.पोलिस कारवाई: महाबळेश्वर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून संशयित आरोपीला अटक केली आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सेल्फीसाठी मिसिंग लिंकवर थांबू नका; एमएसआरडीसीचे वाहनधारकांना आवाहन

संबंधित बातम्या