नवी दिल्ली : चीनने अलीकडेच एका कार्यक्रमात नव्या पिढीची दोन स्टेल्थ फायटर जेट विमानं दाखवली. लष्कराच आधुनिकीकरण करण्याचा चीनचा जो वेग आहे, तो खरच थक्क करुन सोडणारा आहे. चीनने सहाव्या पिढीची फायटर जेट विमानं दाखवली. हा जगासाठी खासकरुन अमेरिकेसाठी मोठा धक्का आहे. कारण अमेरिकेकडे आता पाचव्या पिढीची स्टेल्थ फायटर विमानं आहेत. त्यांनी सुद्धा सहाव्या पिढीची फायटर जेट्स विकसित केलेली नाहीत. चीनची ही प्रगती पाहून इंडियन एअर फोर्सच्या प्रमुखांनी एक महत्त्वाच विधान केलय. “खासगी क्षेत्राच्या सहभागाने भारताने संरक्षण उत्पादन आणि संशोधन क्षेत्रात स्वावलंबी बनावं” असं म्हटलं आहे.
“आज जगामध्ये अस्थिरता आहे. युद्धा आणि स्पर्धा आहे. चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या लष्करीकरणामुळे उत्तर आणि पश्चिम सीमेवर आपल्या काही चिंता आहेत, प्रश्न आहेत” असं एअर चीफ मार्शल ए.पी.सिंह सुब्रतो मुखर्जी परिषदेत म्हणाले. “चीनने त्यांच्या एअर फोर्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. नुकतीच त्यांनी त्यांची स्टेल्थ फायटर विमानं दाखवली” असं ए.पी.सिंह म्हणाले. स्वेदशी बनावटीची तेजस फायटर विमानं सुपूर्द करण्याच्या मंद गतीवर त्यांनी नाराजी बोलून दाखवली. 26 डिसेंबरला चीनची सहाव्या पिढीची नवीन फायटर विमानं पहिल्यांदा जगासमोर आली.
चीन पाकिस्तानला कुठली विमानं देणार?
या फायटर विमानांचे व्हिडिओ पाहून अमेरिकेला सुद्धा धक्का बसला. कारण त्यांनी सुद्धा अजून त्यांच्या सहाव्या पिढीच्या फायटर विमानांच्या प्रोजेक्टला मंजुरी दिलेली नाही. चीनकडे J-20 हे पाचव्या पिढीच फायटर विमान आधीपासूनच आहे. भारताला लागून असलेल्या होतान एअर बेसवर चीनची ही फायटर विमान तैनात आहेत. चीन ही फायटर जेट्स पाकिस्तानला देणार असल्याची बातमी आली होती.
पाचव्या पिढीच्या फायटर विमानांच वैशिष्ट्य म्हणजे ते रडारला सापडत नाही. रडारला चकवा देण्याची क्षमतेमुळे शत्रूच्या प्रदेशात अत्यंत घातक आणि खोलवर हल्ला करता येतो. भारताकडे सध्या राफेलच्या रुपाने 4.5 जनरेशनची फायटर विमानं आहेत. अमेरिकेडे F-22 रॅप्टर, F-35 ही पाचव्या पिढीची फायटर विमानं आहेत. चीनकडे तर सहाव्या पिढीच विमान आहे, म्हणजे ते जास्त अत्याधुनिक असणार.
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |

एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |
सातारा जिल्ह्याला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून ओळख देणार : ना. एकनाथ शिंदे |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
आर.टी.ई अंतर्गत राज्यातील इंग्रजी स्कूलचे २४०० कोटी थकले |