देगाव-सातारा रस्त्यावर परफेक्ट कंपनीजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

by Team Satara Today | published on : 03 December 2025


सातारा : देगाव-सातारा रस्त्यावर परफेक्ट कंपनीजवळ मंगळवारी (दि. 2) ट्रकने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत ओमकार जयवंत गवळी (वय 20, रा. भोसले कॉलनी, कोडोली) याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रथमेश प्रशांत माने (वय 20, रा. कोडोली) आणि त्याचा मित्र ओमकार गवळी हे मंगळवारी (दि. 2) मोटारसायकलवरून देगावहून सातार्‍याकडे निघाले होते. परफेक्ट कंपनीसमोर त्यांच्या मोटारसायकलला सायंकाळी 6.30 च्या सुमारास ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत ओमकार गवळी खाली पडला आणि ट्रकचे मागील चाक त्याच्या अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत प्रथमेश माने यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक राठोड तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसाठी असहकार आंदोलन सुरू करावे; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेळके यांचे आवाहन
पुढील बातमी
ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या कन्येचा आज (गुरुवारी) विवाह सोहळा; मंत्रिमंडळातील मंत्री, विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

संबंधित बातम्या