सातारा : पोटातून ओठात सहजतेने शब्द आले पाहिजेत. मुखातुन पडलेला शब्द हा सत्य व ठामपणे असला पाहिजे. तो दुसऱ्यासाठी सत्कारणी असला पाहिजे. श्रोतावर्ग मंत्रमुग्ध झाला की आपसूकच जग जिंकता येते. असे प्रतिपादन प्रा.श्रीधर साळुंखे यांनी केले.
तारळे, ता.पाटण येथे शब्दप्रभु प्राचार्य शिवाजीराव भोसले वक्तृत्व कला प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन प्रा.श्रीधर साळुंखे यांच्या हस्ते संपन्न झाले.तेव्हा ते मार्गदर्शन करीत होते.ज्येष्ट नेते अध्यक्षस्थानी ज्येष्ट नेते रामभाऊ लाहोटी होते.यावेळी बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर व माजी केंद्रप्रमुख राजाराम भंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा.श्रीधर साळुंखे म्हणाले, "स्वत:शी प्रामाणिक राहून कोणत्याही प्रकारची विसंगत कृती करू नये. याशिवाय, समाजात वावरत असताना चारित्र्य व सत्यपणाची जोपासना केली पाहिजे. आपल्या व्यंगात्मक वर्तनाकडे समाज पाहत असतो. तेव्हा चांगल्या गोष्टींचे प्रकटीकरण झाले पाहिजे. शिक्षण प्रथमतः घेतले पाहिजे. ज्ञान हा परिस आहे. आदर्श वक्तृत्व कलेसाठी मनन व चिंतनातून वक्तृत्व कला विकसित होते. प्रत्येक गोष्टीत प्रशिक्षण असले पाहिजे. किमान एक महिना प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. तेव्हाच काय बोलु नये? हे कळते. अर्थात, प्रशिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. बोलण्यात खोटेपणा असता कामा नये. सहानुभूतीने भीक मागितल्यास यश मिळत नाही. गाव पाठीशी असण्यापेक्षा कायदा महत्वाचा आहे. तरच तो कोणास घाबरण्याचे कारणच ठरू शकत नाही. ज्याच्या नावावर आहे. त्याचाच जागर प्रामुख्याने असला पाहिजे. सध्या असलेल्या कृत्रीम बुद्धिमत्तेस छेद देण्यासाठी वाचनावर स्वत:ची श्रद्धा असली पाहिजे. शब्दांची साधना केल्याशिवाय वक्तृत्व कला हस्तगत करता येत नाही.जे पुढे आहे.त्यावरच लक्ष्य केंद्रित करून वाटचाल करावी."
लहुराज कदम म्हणाले, "घरातूनच खऱ्या अर्थाने प्रशिक्षण मिळत असते. परंतु कुठे कधी थांबावे? हे प्रशिक्षणातूनच कळत असते. खरोखरच,ग्रामीण भागात प्रशिक्षण केंद्र असणे काळाची गरज आहे."
डॉ.अदिती काळमेख म्हणाल्या, "शासनाने वाचन संकल्प चांगल्याप्रकारे राबवला आहे.संवाद कमी झाला आहे. तेव्हा विविध उत्सवाच्या माध्यमातून लोकांनी एकत्र आले पाहिजे.मनात जे आहे ते मनापासून बोलले पाहिजे. मुळात पुस्तकच महासागर आहे. प्रशिक्षण २१ दिवस घेणे क्रमप्राप्त आहे. कविता मनापर्यंत पोहचतात." असे स्पष्ट करीत त्यानी कविता सादर करीत वक्तृत्व कलेबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले. प्रथमतः प्रा. श्रीधर साळुंखे यांच्या हस्ते फीत कापून औपचारिक उद्घाटन केले.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अंनिसचे किशोर धरपडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन सुनील माने यांनी केले. सदरच्या कार्यक्रमास अभिजीत पाटील, ऍड.विलास वहागावकर, माजी केंद्रप्रमुख राजेंद्र सावंत, ढोरोशीचे सरपंच महेंद्र मगर, सरपंच ए. कांबळे, विलास पवार, राहुल रोकडे, बाजीराव न्यायनीत, गौतम माने, शंकर भिसे, संजयबापू शिंदे, संतोष लोखंडे, चंद्रकला माने (आई), विजय भंडारे, सुनीता सुनील माने व संपूर्ण माने परिवार, आंबेवाडीचे सावन्त, घोटचे पवार, आकांक्षा जाधव, विलास पवार, सागर भांदीर्गे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.