सातारा : सातारा जिल्ह्यात आगामी काळामध्ये पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबर कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांना ताकद देण्याचे काम करणार आहोत. जिल्ह्यात मोठी विकासकामे आणण्याच्या दृष्टिकोनातून पक्ष संघटनेची ध्येयधोरणे राबवली जातील, असा स्पष्ट विश्वास भारतीय जनता पार्टीचे नूतन सातारा जिल्हाध्यक्ष व कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केला. येथील शासकीय विश्रामगृहामध्ये डॉ. भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मनोज घोरपडे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, आनंदराव पाटील, डॉ. दिलीप येळगावकर, सातारा लोकसभा समन्वयक सुनील काटकर, माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, शहराध्यक्ष अविनाश खर्शीकर, माजी शहराध्यक्ष विकास गोसावी, राहुल शिवनामे आदी यावेळी उपस्थित होते. डॉ. अतुल भोसले म्हणाले, भाजपच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी नियुक्त झाल्याबद्दल पक्षाच्या वतीने सातार्यात झालेल्या स्वागताने मी भारावलो आहे. भाजप पक्ष जिल्ह्यात मजबूत आहे. पक्षाचे चार आमदार येथे निवडून आले असून त्यापैकी दोन मंत्री आहेत. पक्ष संघटना वाढवल्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले. केंद्रात व राज्यात आपले सरकार असल्यामुळे यापुढील काळात आम्ही मोठी विकास कामे जिल्ह्यात आणणार आहोत. अध्यक्षपदाच्या माध्यमातून तळागाळातील कार्यकर्त्यांना ताकद देणे जुने पदाधिकारी कार्यकर्ते यांना विश्वासाने सोबत घेऊन वाटचाल करणार आहोत. राज्यात महायुतीची सत्ता असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीचे नेते जो निर्णय घेतील तो मान्य आहे. भाजप कार्यकर्ता कामाने मोठा होतो. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले व बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहतील. जिल्हाध्यक्ष पदासाठी इतर नावे पुढे येत होती. अचानक तुमचे नाव पुढे कसे आले ? या प्रश्नावर डॉ. भोसले म्हणाले, हा संशोधनाचा विषय आहे. मी जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक नव्हतो. उलट मी इतर कार्यकर्त्यांची नावे सुचवली होती. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने मला जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. जिल्ह्यात खासदार उदयनराजे भोसले, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची जाहीर केले आहे. आगामी पालिका निवडणुकीत विशेषत: सातार्यात कमळ चिन्ह की युती हा विषय कसा सोडवणार यावर मी बोलू शकत नाही, असे विधान अतुल भोसले यांनी केले. त्यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे पाहत हे वाक्य उच्चारल्यावर दोघेही दिलखुलास हसले. त्यावर ही प्रेस जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांची आहे. त्यामुळे मी बोलू शकत नाही, असे विधान बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी केले. सातारा राजधानीत दोन्ही राजांचा निर्णय अंतिम असतो. त्यामुळे पालिका निवडणुका संदर्भातील निर्णय दोन्ही राजेच घेतील. त्यांचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल, असे भोसले यांनी शेवटी स्पष्ट केले.
कार्यकर्त्यांना ताकद देऊन पक्ष संघटना मजबूत करणार
नूतन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांची ग्वाही
by Team Satara Today | published on : 16 May 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सव समारोप उत्साहात साजरा
January 17, 2026
विषारी औषध प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू
January 17, 2026
साताऱ्यात मंगळवार पेठेतून २१ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार
January 17, 2026
सातारा शहरात तीन दुकाने फोडून ७४ हजारांची रोकड लंपास
January 17, 2026
४० हजार रुपये किमतीच्या २०० किलो वजनाच्या अल्युमिनियम तारेची चोरी
January 16, 2026
सातारा एमआयडीसी व यशोदानगर येथून दुचाकी वाहनांची चोरी
January 16, 2026