इस्रायलशी लढता, लढता ‘हमास’ भारताच्या उंबरठ्यावर

by Team Satara Today | published on : 04 March 2025


पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या रावळकोटमध्ये 5 फेब्रुवारीला एक कार्यक्रम झाला. ‘कश्मीर सॉलिडेरिटी आणि हमास ऑपरेशन’ ‘अल अक्सा फ्लड’ कॉन्फ्रेंस’ असं या कार्यक्रमाच नाव होतं. या इवेंटमध्ये हमास नेते डॉ. खालिद अल-कदूमी सहभागी झालेले. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्यासोबत या मंचावर पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर-ए-तैयबाचे दहशतवादी सुद्धा होते. POK मध्ये आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात हमास नेत्याने सहभागी होण्याची ही पहिली वेळ आहे. या कार्यक्रमात दहशतवाद्यांनी फक्त भारताविरोधात भाषणच केली नाहीत, तर हमासचे झेंडे फडकवत मोटरसायकल आणि घोड्यांवर बसून शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं.

हमास नेत्याच्या POK मधील उपस्थितीनंतर इस्रायलने भारताला याबद्दल गांभीर्याने विचार करण्याच अपील केलय. पाकिस्तानच समर्थन असलेल्या दहशतवादी संघटनांसोबत हमासची हातमिळवणी चिंताजनक असल्याच इस्रायलने स्पष्टपणे म्हटलं आहे. भारताने हमासचा दहशतवादी संघटनांमध्ये समावेश करावा अशी मागणी इस्रायलने केली आहे. भारताने अजूनपर्यंत हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेलं नाही. भारतीय कायद्याच्या UAPA अंतर्गत आतापर्यंत 44 संघटनांना दहशतवादी घोषित करण्यात आलं आहे. पण यात हमासच नाव नाहीय.

अमेरिकेने 1997 साली त्यानंतर यूरोपियन युनियन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन या देशांनी हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलय. रशिया, चीन आणि टर्की सारख्या देशांनी अजून हमासला दहशतवादी संघटना ठरवलेलं नाही. 7 ऑक्टोंबर 2023 रोजी हमासने इस्रायलमध्ये भीषण दहशतवादी हल्ला केला. इस्रायलच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो. त्यानंतर गाजा युद्धाची सुरुवात झाली. यात हजारो लोकांनी आपले प्राण गमावले.

भारत आणि इस्रायलने मागच्या काही वर्षात आपले संबंध मजबूत बनवले आहेत. खासकरुन संरक्षण क्षेत्रात दोघांचा ताळमेळ खूप चांगला आहे. 2002 मध्ये स्थापन झालेली “भारत-इस्रायल जॉइंट वर्किंग ग्रुप ऑन काउंटर-टेररिज्म”ची दरवर्षी बैठक होते. यात सीमा सुरक्षा, दहशतवादी फंडिंग आणि सायबर सुरक्षा सारख्या मुद्यांवर चर्चा होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
चालताना-धावताना धाप लागते, अचानक बीपी वाढते?
पुढील बातमी
‘अ परफेक्ट मर्डर’चा महिला दिन विशेष प्रयोग

संबंधित बातम्या