04:14pm | Jan 10, 2025 |
अमेरिकेच्या लॉस एंजेलिस येथील जंगलातील भीषण आगीत आतापर्यंत १० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. लॉस एंजेलिस काउंटी मेडिकल एक्झामिनर विभागाने सांगितले की, त्यांना गुरुवारी संध्याकाळपर्यंत आगीशी संबंधित घटनांमध्ये १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. पण अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही. दरम्यान, जोरदार वाऱ्यामुळे आग आणखी भडकण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. येथील सहा जंगले आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. अद्याप येथील पाच ठिकाणी आग धगधगत आहे. आगीने जळून खाक झालेल्या घरांमध्ये हॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरांचाही समावेश आहे.
लॉस एंजेलिस काउंटीला लागलेली आगीची घटना आतापर्यंतची ही सर्वात विनाशकारी मानली जात आहे. या आगीत पॅलिसेड्स आणि ईटॉन परिसरातील सुमारे १० हजार घरे जळून खाक झाली आहेत.
लॉस एंजेलिसमधील पॅलिसेड्स, ईटन, हर्स्ट, लिडिया आणि केनेथ या भागात आगीने मोठे नुकसान झाले आहे. पॅलिसेड्समध्ये आगीची सुरुवात कशी झाली? याचा तपास केला जात आहे. या आगीत ५,३०० हून अधिक इमारती नष्ट झाल्या आहेत. ईटनमधील आगीत ४ हजार ते ५ हजार इमारती जळून खाक झाल्याचा अंदाज आहे. पॅलिसेड्समध्ये आगीची तीव्रता अधिक आहे. पॅसिफिक पॅलिसेड्समधील सुमारे २० हजार एकर क्षेत्र आगीने वेढले आहे. आतापर्यंत केवळ ६ टक्के आगीवर नियंत्रण मिळवता आले आहे. येथे अग्निशमन दलाकडून आग नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. येथील परिस्थितीचे सॅटेलाईट फोटो समोर आले असून त्यात आग आणि धुराचे लोट दिसत आहेत.
या वणव्यांमुळे झालेल्या नुकसानीचा आकडा समोर आला आहे. अमेरिकेतील हवामान अंदाज सेवा देणारी खासगी कंपनी Accuweather च्या प्राथमिक अंदाजानुसार, आगीमुळे झालेले नुकसान १५० अब्ज डॉलर्सपर्यंत असू शकतो. "हा वेगाने पसरत असलेला वणवा आधुनिक अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक नुकसान करणाऱ्या वणव्याच्या आपत्तींपैकी एक आहे," असे अॅक्यूवेदरचे मुख्य हवामानशास्त्रज्ञ जोनाथन पोर्टर यांनी म्हटले आहे.
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहराजवळ जमिनीच्या वादातून फायरिंग |
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |
सातारा जिल्ह्याला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून ओळख देणार : ना. एकनाथ शिंदे |