फलटणमधील सराईत दोघांची टोळी तडीपार

सातारा : फलटण येथील सराईत गुन्हेगार असलेल्या दोघांच्या टोळीला तडीपार करण्यात आले आहे. अभिजीत अरुण जाधव (वय 21), आकाश भाऊसो सावंत (वय 23, दोघे रा. मलटण ता. फलटण) अशी त्यांची नावे आहेत.

दोघांच्या टोळीवर फलटण शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरी, घरफोडी चोरी करणे, विनयभंग करणे असे गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर फलटण पोलिसांनी वेळोवेळी संशयित दोघांना अटक करुन तसेच त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केली होती. मात्र गुन्हे करण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. या टोळीमधील संशयित हे फलटण तसेच परिसरामध्ये सातत्याने गुन्हे करत होते. त्यांच्यावर कायदयाचा कोणताच धाक न राहिल्यामुळे फलटण तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता. या टोळीवर सर्वसामान्य जनतेमधुन कडक कारवाई करण्याची मागणी होत होती.

फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोनि हेमंतकुमार शहा यांनी या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे संपूर्ण सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर तालुका, सोलापुर जिल्ह्यातील माळशिरस तालुका हद्दीतून 2 वर्षे तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे पाठवला. याठिकाणी सुनावणी झाली असता संशयितांना 2 वर्षासाठी संपूर्ण सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर तालुका, सोलापुर जिल्ह्यातील माळशिरस तालुका हद्दीतून हद्दपार करण्यात आले.



मागील बातमी
सुसंस्कृत महाराष्ट्राची ओळख जपावी; बीड घटनेवर पृथ्वीराज चव्हाण आक्रमक
पुढील बातमी
कृष्णा कदम यांचा मृतदेह सापडला ५ दिवसांनी

संबंधित बातम्या