सातारा : एका अल्पवयीन मुलास मारहाण केल्याप्रकरणी तीनजणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील बसस्थानक परिसरात ‘तुला व तुझ्या भावास मारणार आहे,’ असे म्हणत तिघांनी एका अल्पवयीनास मारहाण केली. तसेच डोक्यात दगड मारुन जखमी केले. दि. 1 रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास प्रकार घडला. याबाबत संबंधित अल्पवयीन मुलाने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, चैतन्य हणमंत गायकवाड, स्वरुप सुसंगत वाघमळे, शंतनू कदम (तिघे रा. आरळे, ता. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पवार करीत आहेत.