पुणे : राज्यातील सामाजिक आंदोलनाची दिशा ठरवणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील थेट राजकीय पक्षांसोबत दोन हात करणार होते.पंरतु, ऐन वेळी जरांगेंनी निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मराठा आरक्षण विरोधकांना मोठी चपराक बसली आहे. जरांगे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असते तर याचा थेट फायदा महायुतीच्या उमेदवारांना झाला असता, असा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी केला.
जरांगेंच्या नावावर मराठा, ओबीसी आणि मुस्लिम मतं मराठा उमेदवारांच्या मागे एकवटली असती. अशात भाजप विरोधी मतांचे विभाजन होवून थेट फायदा महायुतीच्या उमेदवारांना झाला असता, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. जरांगेच्या भूमिकेला ओबीसी बांधवांचा सर्वच स्तरातून पाठिंबा राहील, असे देखील ते म्हणाले. मराठा आंदोलनाचे राजकारण होण्यापासून त्यामुळे वाचले आहे.निवडणूक न लढण्याच्या जरांगेंच्या भूमिकेमुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आणखी बळ मिळेल, हे निश्चित झाल्याचे पाटील म्हणाले.
मराठा आंदोलक निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरणार असल्यामुळे अनेक उमेदवार पाण्यात देव ठेवून बसले होते.विविध मतदार संघातील राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी यापूर्वीच जरांगेंची भेट घेवून त्यांच्याकडे सहकार्य करण्याचे साकडे घातले होते.आता जरांगेंच्या बदललेल्या भूमिकेचा फटका कुठल्या राजकीय पक्षाला सर्वाधिक बसणार हे निकालानंतर स्पष्ट होईलच, असे पाटील म्हणाले. या निवडणुकीत मराठा, ओबीसी, दलित आणि मुस्लिम समाजाचा कल महत्वाचा ठरणार आहे.ओबीसींनी आरक्षण विरोधी पक्षांना धडा शिकवण्याचा निर्धार केला आहे. विद्यमान सरकारचे समर्थक असलेल्या उमेदवारांना त्यामुळे सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.लवकरच जरांगे यांची भेट घेवून आंदोलनाच्या पुढील वाटचाली संदर्भात चर्चा करणार असल्याचे पाटील म्हणाले.
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |
कोळेवाडी ग्रामसभेत मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा ठराव |
सर्वांना बरोबर घेऊन मलकापूरचा विकास करणार : आ. डॉ. अतुलबाबा भोसले |