फायर फायटिंग बोट ही महाकुंभ मेळा २०२५ साठी प्रयागराजला रवाना

घाटांवर तैनात राहून आग लागताच करणार रेस्क्यू ऑपरेशन

भोपाल येथे तयार केलेली फायर फायटिंग बोट ही महाकुंभ मेळा २०२५ साठी प्रयागराजला रवाना झाली आहे. ही देशातील पहिली फायर फायटिंग बोट आहे. ही बोट महाकुंभ मेळ्याच्या दरम्यान प्रयागराज येथील घाटावर तैनात राहील, जेणेकरून आग लागल्याची घटना घडल्यास आपत्कालीन परिस्थितीत बचावाचे कार्य करेल.

यूपी अग्निशमन सेवेच्या वतीने निविदा जारी करून या बोटीच्या बांधकामाचे काम भोपाळच्या पीएस ट्रेडर्सना देण्यात आले होते. या बोटीची निर्मिती खास करून कुंभ मेळ्यासाठीच केली होती. या फायर फायटिंग बोटीच्या तपासणीसाठी उत्तर प्रदेश अग्निशमन सेवेच एक पथक, तसेच SDRF (State Disaster Response Fund) पथक अशी दोन्ही पथके आली आहेत.

गर्दीच्या ठिकाणी त्वरित मदत

पीएस ट्रेडर्सचे मालक प्रियांश शाह यांनी सांगितले की, महाकुंभ मेळ्यात भरपूर गर्दी असल्याने बऱ्याच ठिकणी आपत्कालीन परिस्थितीत फायर ब्रिगेडच्या गाड्या पोहचू शकत नाहीत. त्यामुळे फायर फायटिंग बोट तयार करण्यात आली.

या परिस्थितींचा सामना करण्यासाठी वेगवेगळ्या घाटांवर फायर फायटिंग बोट तैनात करण्यात येणार आहेत. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी ही बोट मदतीसाठी त्या ठिकाणी पोहचेन. नंतर तेथील आग नियंत्रणात आणून लोकांना वाचवण्याचे काम करेल.

प्रयागराजला ६ बोटी होणार रवाना

मंगळवारी या बोटींची तपासणी केल्यानंतर, पहिली बोट ही प्रयागराजसाठी रवाना झाली आहे. या नंतर पुढील ८-१० दिवसात बाकी पाच बोटी प्रयागराजला रवाना करण्यात येणार आहेत.

या फायर फायटिंग बोटीत एका वेळेस क्रूच्या व्यतिरिक्त १० माणसांची बसायची सोय आहे. या बोटीची मोटार डिझेलवर चालणारी आहे. पण त्याचसोबत यात पेट्रोलसाठी वेगळी टाकी आहे.

मागील बातमी
मोहनलाल यांनी केला 'दृश्यम ३'बद्दल मोठा खुलासा
पुढील बातमी
पाक परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज बलोच म्हणाल्या

संबंधित बातम्या