जुगार प्रकरणी अकरा जणांना अटक

म्हसवड पोलिसांची कारवाई, मुद्देमाल जप्त

by Team Satara Today | published on : 17 July 2025


वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील जुगार अड्ड्यावर म्हसवड पोलिसांनी छापा टाकून सुमारे 3 लाख 12 हजार 670 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी 11 संशयितांना अटक करण्यात आली आहे.

कबीर विठ्ठल बनसोडे, अर्जुन सर्जेराव यादव, सचिन अंकुश यादव, गणेश दिगंबर बनसोडे, विजय भानुदास जगताप, विकास हरी यादव, नानासो रामचंद्र मंडले, बाळासाहेब रावसाहेब मिसाळ, संभाजी मल्हारी मंडले, सिद्धार्थ विश्वनाथ बनसोडे, शिवाजी राम मिसाळ (सर्व राहणार वरकुटे मलवडी) अशी संशयितांची नावे आहेत.

याबाबत म्हसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरकुटे-मलवडी येथे जुगाराचा अड्डा सुरु असल्याची माहिती म्हसवड पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणार्‍या 11 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये 3 लाख 12 हजार 670 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अक्षय सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, अमर नारनवर, देवानंद खाडे, रूपाली फडतरे, जगन्नाथ लुबाळ, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, सतीश जाधव, श्रीकांत सुद्रिक, पोलिस मित्र नारनवर यांनी केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पाँडिचेरी एक्सप्रेसमधून 11 लाखांचे दागिने चोरीस
पुढील बातमी
अतिक्रमण हटविताना आठ जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या