महिलेच्या पर्समधील दागिन्याची चोरी

by Team Satara Today | published on : 17 May 2025


सातारा : महिलेच्या पर्समधील दागिन्याची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील बसस्थानक येथे अज्ञात चोरट्याने महिलेची पर्स चोरुन त्यातील दोन लाख रुपयांचा राणीहार लंपास केला. हा प्रकार दि. 11 रोजी दुपारी 3.30 ते 5.30 या दरम्यान घडला. याबाबत शीतल अजय धनवडे (वय 39, रा. भाकरवाडी, ता. कोरेगाव, सध्या रा. डोंबिवली, प. मुंबई) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवादार कदम तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
पुढील बातमी
मला रोहित पवार यांची कीव येते

संबंधित बातम्या