नारी शक्तीचा सन्मान आणि आदर झालाच पाहिजे : भारतीय जनता पार्टी

by Team Satara Today | published on : 24 August 2024


सातारा : सातारा शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला साक्षी ठेवून, भारतीय संविधानाच्या साक्षीने, समाजातील सर्व नारीशक्तीचा सन्मान आणि आदर व्हायला पाहिजे. भारतीय संविधानात म्हटल्याप्रमाणे, कोणताही भेदभाव न करता सर्व माता-भगिनी, मुली यांना समानतेची वागणूक दिलीच पाहिजे, महिलांच्या बाबतीत अपराध करणार्‍या नराधमांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांच्या अध्यक्षतेखाली नारीशक्तीसाठी समाज जागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांनी महिला, मुली यांच्याकडे वाईट नजरेने बघणारे डोळे फोडले पाहिजेत, बदलापूर सारख्या प्रकरणात घृणास्पद कृत्य करणार्‍या नराधमांना फाशी दिली पाहिजे आणि राज्य सरकार याबाबत नक्कीच कठोर निर्णय घेईल, असे सांगितले.
महिला मोर्चा प्रदेश चिटणीस सुनिशा शहा यांनी नारी शक्तीला आदरपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे आणि त्यांचा अपमान करणार्‍या अपराध्यांना कडक शासन झाले पाहिजे, असे सांगितले.
समाजातील वाईट घटनांबद्दल खेद व्यक्त करून सर्व नारीशक्तीला समान न्याय आणि आदराची वागणूक देण्यासाठी समाजाला जागृत करणारे अभियान राबवताना नारीशक्तीच्या सन्मानाची शपथ यावेळी घेण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रेणू येळगावकर, प्रदेश चिटणीस सुनिशा शहा, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, अनु. जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित भिसे, जिल्हा सरचिटणीस मनीषा पांडे, जिल्हा चिटणीस निशा जाधव, ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष वनिता पवार, ओबीसी महिला शहराध्यक्ष गौरी गुरव, अनुसूचित जाती मोर्चा महिला शहर अध्यक्ष अंजनी त्रिंबके, सातारा शहर उपाध्यक्ष चित्रा माने, युवती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सायली धोत्रे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, डॉ. सचिन भोसले, डॉ. सचिन साळुंखे, अप्पा कोरे, नगरसेवक धनंजय जांभळे, नगरसेवक विजय कटवटे, नगरसेवक सुनील काळेकर, अनु. जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोसले, शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, शहर उपाध्यक्ष चंदन घोडके, जयराज मोरे, विजय नाईक, राजेश शेडगे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अमोल कांबळे, अक्षर भोसले, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम बोराटे, विजय पवार, सनी साबळे, रोहित किर्दत, प्रशांत पोतेकर, आशीष सकुंडे, यशवर्धन मुतालिक, निखिल वाघमारे, प्रथमेश मोरे, अक्षय चांगन, चेतन पवार, अमेय घाडगे, श्रीकांत साबळे, अजय शेळके, तुषार घोरपडे, मयूर साबळे, अजित पवार, सुनील लाड, राहुल राठोड, प्रथमेश इनामदार, हर्षद नलवडे, विशाल सावंत, साहिल मोरे, श्रीधर हदगे, शुभम नाईक आणि पदाधिकारी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळले 
पुढील बातमी
कराड शहर परिसरात पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन

संबंधित बातम्या