सातारा : माण तालुक्यातील म्हसवडजवळील मसाईवाडी गावाच्या हद्दीत एका प्रियकराने तृतीयपंथीय प्रेयसीने लग्न कर आणि मला घरी घेऊन चल असा तगादा लावल्याने साडीच्या सहाय्याने तिचा गळा आवळून तिचा खून केल्याची घटना शनिवारी घडली. पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने खून केल्यानंतर मृतदेहाला सुमारे ३० ते ३५ किलो वजनाचा दगड कंबरेला बांधून विहिरीत टाकून दिले होते. म्हसवड पोलीसांनी जलदगतीने तपास करत सहा तासांतच खुनाचा छडा लावला व आरोपीस गजाआड केले. समाधान विलास चव्हाण , वय ३५, रा.दिवड, ता माण असे संशयित आरोपीचे नाव असून तृतीयपंथी राशी उर्फ राहुल अजिनाथ घुटुकडे वय २५ वर्ष असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद तुषार रंगनाथ घुटकडे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिली आहे.
सातारा गावच्या हद्दीत कच्च्या रस्त्यालगत असलेल्या एका विहिरीत एक अनोळखी मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याची माहिती परिसरातील लोकांनी पोलिसांना दिली. म्हसवड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. पंचनामा करतेवेळी गळा आवळून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने कंबरेस विद्युत वाहक केबलने सुमारे ३० ते ३५ किलो वजनाचा दगड बांधून विहिरीत टाकल्याचे दिसून आले. सदर मृताच्या उजव्या हातावर नाव गोंदलेले असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी त्याआधारेच मयताच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
सदरची माहिती इंस्टाग्राम,व्हाट्सअप,फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियावर प्रसारित केली असता मृताच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात संपर्क केला. यावेळी सदरचा मृतदेह तृतीयपंथी राशी उर्फ राहुल घुटुकडेचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. मृताचे समाधान विलास चव्हाण याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोलिसांनी त्याला शेतात काम करत असताना ताब्यात घेतले. सुरूवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच त्याने मयतासोबत प्रेमसंबंध होते व तो/ती आपणास लग्न कर व मला घरी घेऊन चल असा तगादा लावत होता कायमचा काटा काढल्याचे कबूल केले.
बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यासह खासगी ठेकेदार लाचलुचपतच्या जाळ्यात |
महादरेच्या डोंगरात तरुणाची आत्महत्या |
संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मीक कराडचा एसआयटीने घेतला ताबा |
दुकान फोडून साहित्य चोरी करणारा जेरबंद |
दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन संचलनात शिवम इंगळे करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व |
सातारा जिल्ह्यात मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा |
महाकुंभाला जाणाऱ्या भाविकांची झाशीच्या रेल्वे स्थानकावर मोठी चेंगराचेंगरी |
खंडणीसाठी दहशत माजवणाऱ्यांना अटक |
सन 2019 पूर्वी उत्पादित व नोंदणी झालेल्या सर्व प्रकारातील वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट 31 मार्च 2025 पूर्वी बसविणे बंधनकारक |
ऊस जळून आठ शेतकऱ्यांचे पाच लाखांचे नुकसान |
राष्ट्रीय मानवी तस्करी जनजागृती दिनानिमित्त विधी साक्षरता शिबीर व रॅलीचे आयोजन |
मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त काव्य लेखन स्पर्धा |
आरोग्य कर्मचाऱ्यांना ‘यांत्रिक हजेरी’ अनिवार्य याशनी नागराजन यांचा निर्णय |
मारहाणीसह नुकसान केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
निवृत्त न्यायाधीशांचे घर फोडले; सुमारे नऊ लाखांचा मुद्देमाल लंपास |

सातारा शहराच्या पश्चिम भागात दोन दिवस पाणी नाही |
अंजली दमानिया यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी : रतन पाटील |
समाजाकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टी ग्रंथ वाचनातून येते |
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जनता दरबारास उत्स्फूर्त प्रतिसाद |
महाबळेश्वर, पाचगणीसह कांदाटी खोऱ्यातील पर्यटन वाढीसाठी कटिबद्ध |