जातीवाचक शिवीगाळ आणि खंडणी प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल

by Team Satara Today | published on : 20 June 2025


सातारा : जातीवाचक शिवीगाळ आणि खंडणी प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 मे रोजी सकाळी 11 ते 11:30 वाजण्याच्या दरम्यान राजाराम रघुनाथ कुचेकर रा. अमरलक्ष्मी बस स्टॉप शेजारी, देगाव रोड, कोडोली, सातारा यांनी आशिष भोसले रा. सदर बाजार, सातारा यांना पगाराचे पैसे मागितले असता भोसले यांनी कुचेकर यांना जातीवाचक शिवीगाळ केली. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले करीत आहेत.

दरम्यान आशिष मधुकर भोसले यांनी राजाराम रघुनाथ कुचेकर यांनी वीस लाख रुपये खंडणीची मागणी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शुक्रवार पेठेतील विद्युत खांब बदला, अन्यथा उपोषण
पुढील बातमी
सैदापूर येथे सुमारे सव्वाचार लाखांची घरफोडी

संबंधित बातम्या