सातारा : येथील जुना मोटार स्टॅंण्ड परिसरात मोकळ्या जागेत सुरु असलेल्या जागेतील जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी ५१५ रुपयांच्या रोख रक्कमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
शनिवारी (दि. २५) दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई झाली आहे. सलामत आतार, समीर सलीम कच्छी अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयीतांची नावे आहेत. पोलिस हवालदार अमोल गिरीगोसावी यांनी ही कारवाई केली आहे.