इलेक्ट्रिक डीपी फोडून तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वाठार पोलिसांची कारवाई, २ लाख ४ हजारांचा मुद्देमाल जप्त

by Team Satara Today | published on : 22 August 2026


सातारा : इलेक्ट्रिक डीपी फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा वाठार पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी अमोल ऊर्फ मुक्या विनोद भोसले (वय २२, रा. बनवडी, ता. कोरेगाव) आणि शाहिद कपुर ऊर्फ गुटरी पप्पुसिंग पारधी (वय २८, रा. मालगाव, ता. सातारा) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे २ लाख ४ हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत डीपी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या सूचनेनुसार तपासाला वेग देण्यात आला. अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांच्या पथकाने कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले.

गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढत पोलिसांनी बनवडी परिसरात सापळा रचून अमोल भोसले आणि शाहिदकपुर पारधी यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी नांदवळ, अरबवाडी, अनपटवाडी, देऊर आणि पिंपोडे खुर्द परिसरातून सात इलेक्ट्रिक डीपी चोरी केल्याची माहिती दिली. याप्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात सात स्वतंत्र गुन्हे दाखल असून, पुढील तपास पोहवा सर्जेराव सुळ करीत आहेत. कारवाईत सहभागी पोलीस पथकाचे कौतुक होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कुंभमेळ्याच्या कामात ४५ ते ५० टक्के कमिशन लाटले जात असल्याचा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप
पुढील बातमी
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या नूतन कुलाधिकारीपदी खासदार सुप्रिया सुळे; शनिवारी पदभार स्वीकारला

संबंधित बातम्या