सातारा दिनांक २० प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून भगवा सप्ताह संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रणव सावंत यांच्या पुढाकाराने शाहू बोर्डिंग येथील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली यासाठी जिल्हा परिषद नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राच्या मंगळवार पेठेतील वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत केली.
पद्मविभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे पहिले वस्तीगृह म्हणून या ठिकाणाचा नावलौकिक आहे . ज्या ठिकाणी एकलपालक, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुले राहून रयतच्या शाळेत शिक्षण घेत आहेत या मुलांचे आरोग्य तसेच रक्त हिमोग्लोबिन सीबीसी व इतर घटकांची तपासणी या शिबिरात करण्यात आली याचवेळी येथील विद्यार्थ्यांना फळांचे वाटपही करण्यात आले यासाठी वसतिगृह अधीक्षक प्रशांत गुजरे डॉक्टर सुष्मिता सोनटक्के रमेश देशमुख संध्या किरडे भूषण गायकवाड मीना गुजर उमेश साळुंखे अमोल गोसावी सुनील पवार सागर धोत्रे आधी शिवसैनिक तसेच इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी डॉक्टर सुष्मिता सोनटक्के यांनी दर दोन ते तीन महिन्यातून एकदा शिबीर या ठिकाणी घेण्याच्या आश्वासन दिले प्रशांत गुजरे व प्रणव सावंत यांनी संबंधितांचे आभार मानले.