सातारा : बोरखळ येथे दि ९ रोजी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास प्रज्वल प्रकाश रसाळ, विजयसिंह उत्तमराव पाटील, विक्रम तानाजी रसाळ, अक्षय मोहन पवार (सर्व रा. बोरखळ ता.सातारा) यांनी तक्रारदार सविता मानसिंग रसाळ (वय ५० रा. बोरखळ,सातारा) यांच्या घरात गुलाल टाकल्याने त्यांच्या घरातील संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे सविता रसाळ यांच्या गावातील राहणारे राजेंद्र मारुती नलवडे, पुरुषोत्तम दत्तात्रय शिर्के,सुनील राजाराम रसाळ यांच्या घरात देखील संशयीतांनी गुलाल टाकून त्यांच्या घरातील संसारउपयोगी वस्तूंचे नुकसान केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांत फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक वायदंडे करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
बोरखळ येथे घरात गुलाल टाकल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 11 February 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा