शरीरासाठी जेवढं जेवण महत्वाचं आहे, तेवढीच झोपही महत्वाची आहे. दिवसभर एनर्जी मिळवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी रोज पुरेशी झोप घ्यावीच लागते. जर झोप पूर्ण झाली नाही तर चिडचिडपणा, थकवा, कमी एनर्जी आणि स्मरणशक्ती कमी होणं अशा समस्या होतात. इतकंच नाही तर जर झोप पूर्ण झाली नाही किंवा कमी झोप घेतली तर लठ्ठपणा, डायबिटीस आणि कॅन्सरसारख्या आजारांचा धोकाही वाढतो.
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या एका रिपोर्टनुसार, रिसर्चमधून समोर आलं आहे की, इनसोम्निया म्हणजे झोप पूर्ण न झाल्यानं वेगवेगळ्या हृदयरोगांचा धोका वाढतो. झोप न झाल्यास स्ट्रेस हार्मोन कार्टिसोलचं उत्पादन जास्त होतं. ज्यामुळे तणाव, डायबिटीस, एंक्झायटी आणि डिप्रेशनसोबत हृदयरोगाचा धोका वाढतो.
आमच्या न्यूजलेटरसाठी साईन-अप करा
इनसोम्निया ही एक अशी समस्या आहे, ज्यानं आज भरपूर लोक ग्रस्त आहेत. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, जगभरात १० ते ३० टक्के लोक पुरेशी झोप घेत नाही आणि त्यामुळे वेगवेगळ्या आजारांचे शिकार आहेत. मात्र, लाइफस्टाईलमध्ये काही बदल करून साउंड स्लीपच्या माध्यमातून तुम्ही या आजारांचा धोका टाळू शकता. अशात साउंड स्लीप काय आहे आणि त्याचे फायदे कोणते हे जाणून घेऊ.
साउंड स्लीप म्हणजे काय?
साउंड स्लीपचा अर्थ शांतपणे झोपणे आणि चांगल्या क्वालिटीची झोप घेणे. चांगली झोप घेण्यासाठी तुम्ही काही गोष्टींची मदत घेऊ शकता. जसे की, सकाळी झोपेतून लवकर उठा, म्हणजे रात्री योग्य वेळेवर झोपण्यास मदत मिळेल. तसेच झोपण्याआधी फोन किंवा टीव्ही बघू नका. झोपण्याआधी पाय चांगले धुवा आणि तळपायांनी मसाज करा. यानं चांगली झोप येईल. झोपण्याआधी फार जड जेवण करू नका. झोपण्याआधी दूध पिऊ शकता. रात्री जेवण झाल्यावर काही वेळ चाला. यानंही चांगली झोप येण्यास मदत मिळेल.
मेंदू फ्रेश राहतो
पुरेशी आणि चांगली म्हणजे साधारण ७ ते ८ तासांची झोप घेतल्यावर बॉडी आणि मेंदुला आराम मिळतो. ज्यामुळे मेंदुला आपलं अधिक चांगल्या पद्धतीनं करण्यास मदत मिळते.
स्मरणशक्ती आणि फोकस वाढतो
जर तुम्ही नेहमीच कमी झोपत असाल तर यामुळे तुमची स्मरणशक्ती कमजोर होऊ सकते आणि गोष्टींवर फोकस करण्यासही अडचण येऊ शकते. चांगली आणि पुरेशी झोप घेतली तर स्मरणशक्ती वाढते आणि फोकस सुधारतो.
मूड चांगला राहतो
तुमची नेहमीच झोप पूर्ण होत नसेल किंवा कमी वेळ झोपत असाल तर यामुळे तुमचा चिडचिडपणाही वाढू शकतो. अशात मूड चांगलं ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणं फार महत्वाचं आहे. भरपूर झोप घेतल्यानं तणाव, चिंता आणि डिप्रेशनची समस्या होत नाही.
बीपी आणि कोलेस्टेरॉल
नियमितपणे चांगली आणि पुरेशी झोप घेतल्यास ब्लड प्रेशर आणि कोलेस्टेरॉलसारख्या समस्यांपासून बचाव होतो. जर तुम्ही नेहमीच कमी झोप घेत असाल तर याचा प्रभाव तुमच्या हृदयाच्या आरोग्यावरही पडतो.
वजन कंट्रोल राहतं
झोप कमी घ्याल तर हार्मोन्समध्ये असंतुलन होतं, ज्यामुळे अधिक खाणं आणि वजन वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे रोज रात्री ७ ते ८ तासांची झोप घ्यावी. जेणेकरून वजन कंट्रोलमध्ये ठेवता येईल.