सातारा : न्हाळेवाडी (पुनर्वशीत) ता. सातारा येथील दोन वर्षाच्या जय खंडागळे या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. वन विभागाकडून २५ लाखांची मदत जाहीर झाली असून त्यातील दहा लाख रुपये तातडीने नातेवाईकांना देण्यात आले. संबंधित बिबट्याला पकडण्यासाठी वन कर्मचाऱ्यांनी न्हाळेवाडी, शिवथर, मालगाव या पाच किलोमीटर अंतरात तीन सापळे लावले आहेत. तसेच ड्रोनने या शिवाराची पाहणी सुरू आहे.
याबाबत माहिती अशी की, न्हाळेवाडी येथील जय खंडागळे या चिमुरड्यावर शनिवारी रात्री बिबट्याने हल्ला केला होता. या घटनेनंतर जयचा मृतदेह हा शासकीय रुग्णालयात ठेवला होता. यावेळी मृतदेह ताब्यात न घेता नातेवाईक तसेच आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ थेट न्यायासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर निवासस्थानी गेले. वनविभाग तसेच महावितरणच्या कारभाराबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे रोष व्यक्त करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाचे अधिकारी तसेच सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निलेश तांबे उपस्थित होते.
दरम्यान, वनविभागाकडून २५ लाखांची मदत जाहीर झाली असून त्यातील दहा लाख रुपये हे तातडीने नातेवाईकांना दिल्याचे वनरक्षक संदीप झोपाळे यांनी दिली. उर्वरित रक्कम ही शासकीय नियमानुसार लवकरच मिळवून देण्यात येणार आहे. या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करू असे आश्वासन वन विभागामार्फत देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात वनविभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची व उपाययोजना करण्यासाठी बैठक आयोजित केले आहे. दरम्यान, या मदतीवर बोलताना जयचे वडील संदीप खंडागळे म्हणाले, ‘मदत मिळाली तरी माझा मुलगा मला पुन्हा मिळणार आहे का?
'त्या' बिबट्याला पकडण्यासाठी न्हाळेवाडीसह शिवथर परिसरात तीन सापळे; वनविभागाकडून चिमुकल्याचा नातेवाईकांना २५ लाखांची मदत जाहीर
by Team Satara Today | published on : 05 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा