वरण भात न आवडल्याने आईवर चाकूने वार; मुलाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा

by Team Satara Today | published on : 24 May 2026


सातारा  : जेवणामध्ये वरण भात वाढले होते. ते न आवडल्याने वृद्ध मातेच्या मनगटावर चाकूने वार करून त्यांना जखमी केले. ही घटना शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अभिनव अपार्टमेंटमध्ये सुखवास्तू या इमारतीमध्ये घडली. याप्रकरणी मुलाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप शशिकांत भोसले (वय ५५) असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २२ रोजी रात्री ११ वाजता रत्नमाला शशिकांत भोसले वय ८२, रा. अभिनव अपार्टमेंट, सातारा यांनी बनवलेले जेवणातील वरण-भात आवडले नाही म्हणून संदीपने तिच्या आईला तू माझ्या घरात रहायचे नाही, निघून जा, असे म्हणून त्याने किचनमधील चाकू आणून दारूच्या नशेत त्यांच्या मनगटावर चाकूने तीन ठिकाणी कापले, त्यांना मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी संदीप भोसले यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार वाघ करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा
पुढील बातमी
अवैधरित्या पिस्टल बाळगल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा ; एक लाख 23 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

संबंधित बातम्या