01:37pm | Jan 10, 2025 |
सातारा : 24 व्या सातारा ग्रंथ महोत्सवाची शुक्रवारी ग्रंथदिंडीने शानदार सुरुवात झाली. सातारा शहरातल्या विविध शाळांनी ग्रंथदिंडीमध्ये काढलेल्या चित्ररथातून भारतीय संस्कृतीचे मनोहरी दर्शन झाले. या ग्रंथ दिंडीला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिंडीचे उद्घाटन ज्येष्ठ गीतकार प्रवीण दवणे व पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रंथ महोत्सव संयोजन समितीचे कार्यवाहक शिरीष चिटणीस, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय सदस्य व शाहूपुरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, दैनिक प्रभात चे निवासी संपादक श्रीकांत कात्रे, डॉ संदीप श्रोत्री, माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, सहकोषाध्यक्ष प्रदीप कांबळे, सहसमन्वयक सुनिता कदम, सहसमन्वयक प्रल्हाद पार्टे, प्रमोदिनी मंडपे, माजी शिक्षणाधिकारी राजकुमार निकम तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
या ग्रंथ दिंडीची सुरुवात श्रीफळ वाढवून करण्यात आली. आकर्षकरित्या फुलांनी सजवलेल्या ग्रंथ दिंडीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली व संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या प्रतिमा तसेच ग्रंथ आकर्षक पद्धतीने ठेवण्यात आले होते. या ग्रंथ दिंडीला पोलीस अधीक्षक समीर शेख व ज्येष्ठ पत्रकार विनोद कुलकर्णी यांनी खांदा दिला या ग्रंथदिंडीला व ग्रंथमहोत्सवाच्या आगामी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. सकाळच्या थंडगार हवेत आणि उत्साह पूर्ण वातावरणामध्ये ग्रंथ दिंडीचे उद्घाटन पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ग्रंथ दिंडी गांधी मैदान राजवाडा येथून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी नगरीकडे रवाना झाली. या ग्रंथ महोत्सव दिंडीला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. छत्रपती शिवराय आणि त्यांचे अष्टप्रधान मंडळ, लिहिते व साक्षर व्हा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, तसेच मराठी भाषा अभिजात दर्जा, अशा विविध विषयांवर वेगवेगळ्या शाळांनी आकर्षक चित्ररथ सादर केले. या चित्ररथांमधून मुलांची सामाजिक विषयांविषयी असणारी संवेदना दिसून आली. ग्रंथदिंडी अत्यंत शिस्तबद्ध रित्या तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी कडे मार्गस्थ झाली. अर्ध्या तासाच्या श्रम परिहारानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहराजवळ जमिनीच्या वादातून फायरिंग |
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |
सातारा जिल्ह्याला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून ओळख देणार : ना. एकनाथ शिंदे |