एअर शो निमित्त दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सातारा शहरात वाहतुकीत बदल

by Team Satara Today | published on : 25 November 2026


सातारा : सातारा सैनिक स्कूल शाळेच्या वतीने व भारतीय वायु सेनेच्या सहकार्याने भारतीय वायु सेनेची सुर्यकिरण एरोबॅटिक टिम साताऱ्यात दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी  हवाई कसरती सादर करणार आहेत. या कार्यक्रमास सैनिक स्कूल सातारा या ठिकाणी व्हीव्हीआयपी, व्हीआयपी तसेच संपूर्ण सातारा शहर व जिल्हयातून मोठ्या प्रमाणात शालेय विदयार्थी विदयार्थीनी, नागरीक यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणेची शक्यता आहे. याकरिता सदर कार्यक्रमावेळी वाहतुकीस कोणताही अडथळा होवु नये म्हणुन वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात येत आहे.
अ) वाहतुकीकरीता बंदी घालणेत आलेला मार्ग -

दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजीचे सकाळी ०८.०० वा. पासुन ते दुपारी ०२.०० वा.पर्यंत खालील नमुद मार्गावर सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंदी घालणेत येत आहे.
१) पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक व बॉम्बे रेस्टॉरट चौक ते पोवई नाका हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना बंद करणेत येत आहे.
२) गोडोली नाका, साईबाबा मंदिर मार्गे जिल्हा परिषद चौक येथे येणेस व जाणेस सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करणेत येत आहे.
३) कनिष्क मंगल कार्यालय बाजुकडुन जिल्हा परिषद चौक येथे येणेस व जाणेस सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करणेत येत आहे.
ब) वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग-
१) बॉम्बे रेस्टॉरंट बाजुकडुन सातारा शहरात प्रवेश करणारी सर्व प्रकारची वाहने ही अजंठा चौक, गोडोली नाका मार्गे पोवई नाका बाजुकडे येतील व त्याच मार्गाने बाहेर जातील.
२) वाढे फाटा बाजुकडुन सातारा शहरात प्रवेश करणारी सर्व प्रकारची वाहने ही जुना आर.टी.ओ चौक-पारंगे चौक पोवई नाका मार्गे येतील व त्याच मार्गाने बाहेर जातील.
३) खेड चौक बाजुकडुन सातारा शहरात प्रवेश करणारी सर्व प्रकारची वाहने ही सिव्हील हॉस्पीटल पोवई नाका मार्गे आत येतील व त्याच मार्गाने बाहेर जातील.
४) मोळाचा ओढा बाजुकडुन सातारा शहरात प्रवेश करणारी सर्व प्रकारची वाहने ही भुविकास चौक - एसटी स्टेंड - पोवई नाका मार्गे येतील व त्याच मार्गाने बाहेर जातील.
क) वरील सर्व मार्गावर रूग्णवाहिका पोलीस वाहने, अग्निशामक दलाची वाहने, इतर सरकारी वाहने वगळून इतर सर्व प्रकारच्या वाहनात वरील प्रमाणे बदल करण्यात येत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एल निनोच्या आव्हानावर मात करण्यासाठी सातारा जिल्ह्यात नाविन्यपूर्ण 'खोडवा ऊस विकास कार्यक्रम - प्रकल्प संचालक अजय शेंडे
पुढील बातमी
सात वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा अखेर जाळ्यात; मोळाचा ओढा परिसरातून फरार आरोपीला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

संबंधित बातम्या