तरुणांनो, मला तुमचा अभिमान! दिल्लीतील आंदोलनावर राहुल गांधींची प्रतिक्रिया; आम्ही मागे हटणार नाही, मोदी सरकारला दिला थेट इशारा

by Team Satara Today | published on : 10 October 2026


दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) कडून आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, जंतरमंतरवर पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे. या घडामोडींवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देत सरकारवर निशाणा साधला आहे. देशातील तरुणांचा मला अभिमान आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असा संदेश राहुल गांधी यांनी दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, “मी नरेंद्र मोदी, आरएसएस आणि त्यांच्याशी संबंधित लोकांविरोधात एका दशकाहून अधिक काळापासून लढत आहे. माझ्या विरोधकांना मी जितक्या चांगल्या प्रकारे समजतो, तितक्याच चांगल्या प्रकारे एखादी व्यक्ती आपल्या प्रतिस्पर्ध्याला समजत असेल. मी त्यांना आतून ओळखतो. त्यांच्या प्रत्येक खेळीची मला माहिती आहे.” हे लोक घाबरट आहेत. नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत, ज्ञानेश कुमार आणि अजित डोवाल हे खलनायक आहेत. आता ते हळूहळू घेरले जात आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
पुढे बोलताना त्यांनी मोदी सरकारला थेट इशारा दिला. “तुम्हाला जे करायचं आहे, ते करा. जितके पोलीस बोलवायचे आहेत, तितके बोलवा. १० हजार, २० हजार किंवा ५० हजार; तुम्हाला हवे तितके पोलीस बोलवा. सर्व नेत्यांना अटक करा. सर्व तरुणांना अटक करा. आम्हा सर्वांनाच अटक करा. घाबरू नका. आम्ही तुम्हाला चारही बाजूंनी घेरत आहोत आणि आम्ही मागे हटणार नाही,” असं ते म्हणाले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्पर्धा परीक्षार्थींवर पोलिसांनी केलेली कारवाई अन्यायकारक; परीक्षार्थींच्या पाठीशी वकिलांची फौज उभी करणार; रोहित पवारांची घोषणा
पुढील बातमी
आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने राज ठाकरे यांची केंद्र सरकारवर जोरदार टीका; ज्या देशाने परकियांचा माज उतरवला, तिथे स्वकियांचा माज जनता उतरवणार नाही वाटतं का?

संबंधित बातम्या