सातारा : कोंडवे, ता. सातारा येथे एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याची खबर उमेश कांबळे (रा. कोंडवे) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.
नरेश सुरेश कांबळे वय 36 असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. त्याला अधिक उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकलेले नाही. दि. 24 जानेवारी रोजी रात्री नऊच्या पूर्वी हा प्रकार घडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सहाय्यक फौजदार माने एस के अधिक तपास करत आहेत.