क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळ्याची समाज माध्यमांवर व्हायरल झालेली पत्रिका चुकीची; खोडसाळपणा करणाऱ्यांवर प्रशासन कारवाई करणार

by Team Satara Today | published on : 31 December 2025


सातारा  :  सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने दरवर्षी 3 जानेवारी या दिवशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगांव असणाऱ्या मौजे नायगाव ता. खंडाळा या ठिकाणी साजरा केला जातो. सदर कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळातील अनेक  मंत्री महोदय व अनेक मान्यवरांची उपस्थिती असते. 

यावर्षी क्रांतीज्योती  सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम देखील प्रस्तावित आहे. सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्यावतीने अतिशय चांगले व सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेकडून कार्यक्रमपत्रिका तयार करुन राजशिष्टाचार शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांचेमार्फत तपासणी करुन घेऊन अंतिम करण्यात येते. तथापि दि.3 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मदिवसाचे अनुषंगाने मागील वर्षीच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये खोडळसाळपणा करुन मान्यवरांची नांवे राजशिष्टाचाराप्रमाणे न छापता एक बनावट पत्रिका तयार करण्यात येऊन सदर पत्रिका समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आलेली आहे. यामुळे समाजातील काही लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. सदर कार्यक्रम पत्रिका ही सातारा जिल्हा परिषदेमार्फत छपाई व मान्यवरांना वितरीत केलेली नसून प्रशासनाच्या मान्यतेशिवाय प्रसारित झालेली असून या पत्रिकेतील मजूकराविषयी जिल्हा परिषदेचा कोणताही संबंध नाही सबब असे कृत्य करणाऱ्या व निमंत्रण पत्रिका प्रसारित करणाऱ्या जबाबदार व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

तसेच जिल्हा परिषदेच्या वतीने सदर कार्यक्रमाची पत्रिका राजशिष्टाचारानुसार छपाई करण्याची संपूर्ण कार्यवाही करुन अंतिम केलेली कार्यक्रम पत्रिका सर्व मान्यवरांना देण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येईल. सदर कार्यक्रम राजशिष्टाचारानुसार पार पाडण्याची जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासनाकडून पार पाडण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि जिल्हा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांनी सांगितले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
श्रीसमर्थ सेवा मंडळातर्फे नामवंत वेदमूर्तींच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन ; दि. 9 जानेवारीला समर्थ सदन येथे सत्कार सोहळा.
पुढील बातमी
जिल्हा परिषदेकडील यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजनेचा निधी तातडीने खर्च करावा - पालकमंत्री शंभूराज देसाई

संबंधित बातम्या