सातारा : शहरातील सदरबझार परिसरातील लक्ष्मी टेकडी येथे पार्किंगमध्ये झालेल्या वादातून एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल मोहिते यांनी आरोपींना “कोयते घेऊन येथे कशासाठी आला आहात?” असा जाब विचारला असता, आरोपींनी संतापून फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी तिन्ही आरोपींनी फिर्यादीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.यातील हर्षल उर्फ भोया पवार याने हातातील कोयत्याने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर वार करून जखमी केले.
ही घटना लक्ष्मी टेकडी, सदर बाजार परिसरात घडली आहे. याप्रकरणी अनिल बापूराव मोहिते (वय ३६, रा. लक्ष्मी टेकडी, सदर बाजार, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून हर्षल उर्फ भोया पवार (रा. रविवार पेठ, सातारा), अक्षय पवार (रा. लक्ष्मी टेकडी, पाण्याची टाकी परिसर, सातारा) आणि निशांत शेख (रा. संगम माहुली, ता. सातारा) यांच्याविरोधात शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार सावंत करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.