कासवंडमधील हिराबाग हॉटेलवर बारबालांचा बिभत्स डान्स

महाबळेश्वर : कासवंड (ता. महाबळेश्वर) येथील एका हॉटेलवर उत्तान कपडयात बिभत्स हावभाव करुन अंगविक्षेप करुन नृत्य करीत असताना पाचगणी पोलिसांनी छापा टाकून मुद्देमालासह संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, पाचगणी सारख्या जागतिक पर्यटन स्थळाच्या ठिकाणी गायिकांच्या व महिला वेटरच्या नावाखाली बारबाला महिला आणुन त्यांना संगिताच्या तालावर कमी कपडयात बिभत्स हावभाव करुन अंगविक्षेप करुन नृत्य करण्याचे प्रकार सुरू आहेत. याबाबत सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समिर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, सातारा व वाई उपविभागिय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांनी यांनी कडक कारवाई करणेबाबत निर्देश दिले होते. पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी काल (मंगळवारी) रात्री त्यांच्या खास बातमीदारामार्फत माहिती मिळताच, त्यांचेकडील खास पथकाने भिलार, कासवंड हद्दीतील हॉटेल हिराबाग (बिलिव्ह) हॉटेलच्या हॉलवर कारवाई केली. सपोनि दिलीप पवार हे पोलीस उप निरीक्षक बालाजी सोनुने, सहाय्यक फौजदार रविंद्र कदम, पोलीस हवालदार श्रीकांत कांबळे, कैलास रसाळ, विनोद पवार, सचिन बोराटे , पोलीस नाईक तानाजी शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश लोखंडे, सुमित मोहिते, रेखा तांबे या टिमने कारवाई करत ग्राहकांसमोर बिभत्स हावभाव करणार्‍या नृत्यांगनासह 20 ग्राहकांवर कारवाई केली. घटना स्थळावरून साऊंड सिस्टीम, माईक, मोबाईल व कार असा एकुण 25 लाख 45 हजार 500 रुपये किंमतीचे साहीत्य जप्त करून ताब्यात घेण्यात आले आहे.



मागील बातमी
अनंत इंग्लिश स्कूलमध्ये प्लास्टिक निर्मूलन उपक्रम
पुढील बातमी
सातारा शहर परिसरात एका अल्पवयीन मुलीचे अपहरण, तर एक बेपत्ता

संबंधित बातम्या