नवी दिल्ली : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर अवकाशात आहेत. बोईंगच स्टारलायनर स्पेसक्राफ्ट त्यांना पृथ्वीवर घेऊन येण्यात अपयशी ठरलं. बोईंगच्या प्रतिष्ठेला यामुळे धक्का बसला. बोईंग कंपनीसाठी आता एक चांगली बातमी आहे. बोईंग कंपनीला नायजेरियन सरकारकडून एक मोठी डील मिळाली आहे. नायजेरियाने बोईंगसोबत विमानांची देखभाल आणि सुरक्षेसंदर्भात करारावर स्वाक्षरी केली आहे. नायजेरियन सरकार आणि बोईंगमध्ये एक करार झालाय. त्यानुसार, बोईंगच्या एयरपोर्ट्स इंजीनियरिंगची टीम नायजेरियात हवाई प्रवास आणि संबंधित सुविधांमध्ये अधिकर सुधारणा घडवून आणेल. या करारामुळे नायजेरियन एयरलाइन्सची क्षमता वाढेल, अधिक अत्याधुनिक बनेल असं नायजेरियाच्या हवाई उड्डायाण मंत्र्याने सांगितलं.
या डील अंतर्गत बोईंगला नायजेरियन एयरलाइन्स ऑपरेटर्सना प्लानिंग वर्कशॉप, ट्रेनिंग, टेक्नीकल सपोर्ट द्यावा लागेल. नायजेरियाने गुरुवारी बोईंग सोबत हा महत्त्वपूर्ण MOU साइन केला. यामुळे नायजेरियन एयरलाइन्ससाठी विमान भाड्यावर घेणं, देखभाल आणि टेक्निकल सपोर्ट वाढेल. नायजेरियाचे विमानन मंत्री फेस्टस कीमो आमि बोईंगच्या अधिकाऱ्यांनी सिएटलमध्ये या MOU वर स्वाक्षरी केली.
बोईंगने आफ्रिकेत 60 एयरलाइन्सना 500 विमानांचा पुरवठा केला आहे. या कंपनीला 2014 मध्ये NASA कडून स्पेस मिशनसाठी मोठी डील मिळाली होती. पण त्यांचं स्पेसक्राफ्ट पहिल्याच मिशनमध्ये फेल अपयशी ठरलं. त्यामुळे कंपनीला अब्जावधी डॉलर्सचा फटका बसल्याचा अंदाज आहे. बोईंगच हे स्पेसक्राफ्ट फेल झाल्याने सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर मागच्या 3 महिन्यापासून अवकाशातच आहेत.
नासाने आता दोघांना परत आणण्यासाठी स्पेसएक्सची निवड केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नासाच्या या निर्णयामुळे बोईंगला 1 अब्ज डॉलर्सच नुकसान झालय. नासाने कमर्शियल क्रू प्रोग्रामतंर्गत बोईंगला 4.2 बिलियन डॉलर आणि स्पेसएक्सला 2.6 बिलियन डॉलरच कॉन्ट्रॅक्ट दिलं. NASA कडून कमर्शियल क्रू प्रोग्रामसाठी दिली जाणारी रक्कम फिक्स होती.