सातारा : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 4 रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील एका किराणामालाच्या दुकानासमोर लघवीसाठी उभे राहून एका महिलेशी असभ्य वर्तन करुन तिला शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी रवी सुरेश कुंभार (रा. करंजे, सातारा) याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार वरे करीत आहेत.