सातारा : पिलेश्वरीनगर येथे राहणाऱ्या दिपाली आवळे यांना त्यांचे पती सतीश रमेश आवळे (रा. वडगाव, ता. कराड) यांनी पिल्लेश्वरीनगर येथील घरी जाऊन घरगुती वादातून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यावेळी तिच्या डोक्यावर, पायावर बेदम मारहाण करून तिला गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
याप्रकरणी जखमी दिपाली आवळे यांचा भाऊ राहुल नंदकुमार वायदंडे (वय ३३ वर्ष रा. चिखली, ता. कडेगाव जि.सांगली) यांनी दाजी सतीश आवळे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केल्याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.