सातारा : अवैधरित्या जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तीनजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरफळ ता.सातारा गावच्या हद्दीत गायींची वाहतुक होताना सातारा तालुका पोलिसांनी पकडून तिघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दि. 19 जुलै रोजी पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी लग्माना अडीअप्पा नाईक (वय 33), काशाप्पा लक्ष्मण धासनट्टी (वय 55, दोघे रा.तेरणी ता.गड), बाळाप्पा कलाप्पा रामनकट्टी (वय 60, रा. शिवापूर जि.बेळगाव) असे संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी पिकअप या वाहनातून 4 गायी व 1 खोंड यांची सुटका केली. संशयितांनी जनावारांना दाटीवाटीने भरुन त्यांना क्रूरतेची वागणूक दिली असल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सातारा तालुका पोलीस करीत आहेत.