शास्त्रीय उपचार आणि मनोनिर्धाराने व्यसनमुक्ती शक्य - जिल्हा कारागृह अधीक्षक टी. एस. निंबाळकर; परिवर्तन संस्थेत व्यसनमुक्तांचा सत्कार

by Team Satara Today | published on : 28 June 2026


सातारा : कोणतंही व्यसन आपोआप सुटत नाही. शास्त्रीय उपचार आणि मनोनिर्धाराने व्यसनमुक्ती शक्य आहे असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा कारागृहाचे अधीक्षक श्री. टी. एस. निंबाळकर यांनी व्यक्त केले.

परिवर्तन व्यसनमुक्ती संस्थेने आयोजित केलेल्या व्यसनविरोधी दिना निमित्त आयोजित केलेल्या व्यसनमुक्तीचे स्वानुभव कथन कार्यक्रमात ते बोलत होते.  यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जेष्ठ पदाधिकारी सुकुमार मंडपे आणि सामाजिक कार्यकर्त्या प्राचार्य प्रमोदिनी मंडपे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

श्री. निंबाळकर पुढे म्हणाले की, व्यसन पदार्थ किंवा द्रव्याचे असले तरी ते वाईटच आहे. त्याचा कुटुंबावर परिणाम होतो. परिणामी व्यक्ती हिंसा करते. गुन्हा घडू नये असे वाटत असेल तर सदमार्गाने आपले आयुष्य जगायला हवे कारण व्यसन हितरक्षण करत नाही. सहज उपलब्ध होणाऱ्या व्यसनांना प्रतिबंध प्रत्येकाने करायला हवा. युवकांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगल्या सवयी आत्मसात करायला हव्यात सांगितले. 

यावेळी दीर्घाकाळ व्यसनमुक्त असणारे राहुल दणाने यांनी आपल्याला केवळ आजचा दिवस व्यसन करायचे नाही या तत्वाने व प्रमाणात दारू पिता येणार नाही हे मान्य केल्यानेच गेली वीस वर्ष दारूच्या एका थेंबापासून लांब आहे म्हणाले.  संतोष गंधाले यांनी व्यसन सोडताना म्हणाले केवळ दोन मुलांचा विचार केला की त्यांना व्यसन लागूच नये म्हणून मला व्यसन करता कामा नये हा निश्चय केला. तब्बल एकवीस वर्ष झाली दारूच्या व्यसनापासून दूर आहे.

श्री. फाळके यांनी जिद्द, चिकाटी आणि सातत्य या सूत्रावर कायम दारू पासून दूर असल्याचे सांगितले. सुनील मोरे म्हणाले की,  व्यसनी मित्र आणि ठिकाण यांच्या पासून सावध राहणं गरजेचे. मागील दहा वर्षात दोन कोट रुपयांची मालमत्ता कष्टाने मिळवू शकलो. 

सर्व व्यसनमुक्त बांधवाचा पुस्तक संच भेट देवून शाश्वत व्यसनमुक्तीच्या शुभेच्छा मान्यवरांच्या हस्ते देण्यात आल्या. 

प्रमोदिनी मंडपे यांनी संस्थेच्या कार्याबाबत माहिती देवून समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाना माने, अक्षय सकपाळ यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सौ. सोनाली होळ, प्रस्तावना किशोर काळोखे तर आभार विश्वजीत तिवाटणे यांनी मानले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पोक्सो गुन्ह्यातील एकास पोलीस कोठडी
पुढील बातमी
खटावमधील शिरसवस्ती लगतचा गावठी हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्व‌स्त; एक लाखाचा मुद्देमाल जागेवरच नष्ट

संबंधित बातम्या