वाढदिवसाच्या दिनी फ्लेक्स लावू नका : सुशील दादा मोझर

by Team Satara Today | published on : 04 August 2025


सातारा : दिनांक 6 ऑगस्ट रोजी रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे सहकारी सुशील दादा मोझर यांचा वाढदिवस असून वाढदिवसाच्या दिवशी कुणीही फ्लेक्स बॅनर व कोणताही कार्यक्रम आयोजित करू नका असे आवाहन त्यांनी केले आहे.  

सुशील दादा मोझर यांचा वाढदिवस युवकांसाठी एक पर्वतीच असतो मात्र 6 ऑगस्ट रोजी सुशील दादा यांचा वाढदिवस दरवर्षी साजरा होतो. मात्र यंदाच्या वर्षी वाढदिवसाच्या दिनी परदेशात प्रवासात असल्याने कोणीही फ्लेक्स कटआउट बॅनर बाजी अथवा कोणताही कार्यक्रम आयोजित करू नका असे आवाहन सुशील दादा यांनी केले आहे. 

नुकतीच सातारा नगर परिषदेने काही ठिकाणावर फ्लेक्स बंदी केली आहे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी साताऱ्यात वाढदिवसाच्या दिनी फ्लेक्स बाजी झाल्याने सातारकरांच्या मनात तीव्र संताप होता मात्र रक्षक प्रतिष्ठानचे सुशील दादा मोझर यांनी वाढदिवसाच्या दिनी फ्लेक्स लावू नका, असे आवाहन केल्याने नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अजिंक्यतारा कारखाना किफायतशीर दर देण्यासाठी कटिबद्ध
पुढील बातमी
साताऱ्यातील अंजनाताईंना राष्ट्रपतींचे निमंत्रण

संबंधित बातम्या