कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या डब्याला आग

ट्रेनमध्ये १५०० हून अधिक प्रवासी

by Team Satara Today | published on : 14 February 2025


कोल्हापूर : कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये एक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गाडीला आग लागल्याची घटना घडली. या घटनेनंतर ट्रेनमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र रेल्वेतील प्रवाशांनी वेळीच प्रसंगावधान राखून रेल्वेतील चैन ओढली आणि रेल्वे तात्काळ थांबवण्यात आली. हातकलंगले आणि रुकडी दरम्यान पंचगंगा पुलाजवळही ही घटना घडली. अचानक रेल्वेच्या एसी एम २ मध्ये आग लागली आणि आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली.

प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस ट्रेन क्रमांक १७४१२ हातकणंगले ते रुकडी दरम्यान पंचगंगा पुलाजवळ अचानक आग लागली. ट्रेनमध्ये आग लागताच प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवून गाडीची चेन ओढली यानंतर पाहिले असता एसी एम दोन या बोगीच्या चाकाला घर्षणामुळे आग लागल्याचे निदर्शनास आले.

गाडीतील ही आग सिलेंडरने विझवून तात्काळ ही गाडी मिरजेकडे रवाना झाली आणि मिरजे मध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या बोगीची पाहणी करून गाडी सुस्थितीत असल्याची खात्री केल्यानंतर तब्बल एका तासाने ही गाडी मुंबईकडे रवाना झाली.सिलिंडरला आग लागताच, ट्रेन तात्काळ मिरजेकडे रवाना झाली आणि मिरजेतील रेल्वे अधिकाऱ्यांची मदत घेतल्यानंतर, बोगीच्या एका धक्क्याने ट्रेन मुंबईकडे रवाना झाली.

कोल्हापूर स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर वळीवडे स्थानकाच्या काही किलोमीटर आगीची घटना घडल्यावर प्रवाशांनी साखळी ओढून गाडी थांबवली. प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या आणि सुरक्षित स्थळी जाऊन प्रवासी थांबले. गाडी सुरक्षित असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी पुन्हा गाड्यांमध्ये चढून प्रवास केला. या गाडीचे इंजिन नदी शेजारी थांबल्यामुळे अनर्थ ठरला. साखळी ओढल्यानंतर गाडी नदीवर थांबल्यानंतरप्रवाशांनी थेट नदीमध्ये उड्या घेतल्यास आणि मोठी दुर्घटना घडली असती.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईसाठी कोल्हापूरातून रात्री ८.३५ च्या दरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेस निघते. यामध्ये अनेक आमदार , खासदार , सेलिब्रिटी यांचा समवेश असतो. आज तर चक्क १५०० हून अधिक प्रवाशी ट्रेनमध्ये होते. ट्रेन नेहमीप्रमाणे आपल्या वेळेमध्ये कोल्हापूरवरून निघाल्यानंतर रुकडीच्या जवळ पोहचताच अचानक सर्वच डब्यांमध्ये जळाल्याचा वास येऊ लागला.

तसेच या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून रात्री ट्रेनची पूर्ण तपासणी करण्यात आली. त्यानंतर ही ट्रेन रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने पुढे नेण्यात आली. दरम्यान ट्रेनला आग लागल्याचे कळताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे दिमाखदार आयोजन करा : जिल्हाधिकारी संतोष पाटील
पुढील बातमी
सज्जनगडावर दासनवमी महोत्सवाची वाढली रंगत

संबंधित बातम्या