सातारा : मारहाण प्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी रात्री नऊ वाजता दौलत नगर, रानमळा, करंजे येथे अमित चंद्रकांत एकार रा. दौलत नगर, सातारा यांना तेथीलच दत्तात्रय उत्तम घाडगे यांनी गाडीवरून सोडायला नकार का दिला, असे म्हणून हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. अधिक तपास पीएसआय ढमाळ करीत आहेत.