सातारा : धरणाच्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुनवडी ता.सातारा येथे उरमोडी धरणाच्या पाण्यात बुडून हणमंत राणू देवरे (वय 52, सध्या रा.मंगळवार पेठ, सातारा) यांचा मृत्यू झाला. ही घटना दिे. 28 ऑक्टोबर रोजी घडली आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्यात याची नोंद झाली असून पुढील तपास पो. कॉ. वायदंडे करीत आहेत.
पुनवडीत उरमोडी धरणाच्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू
by Team Satara Today | published on : 29 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा