सातारा : सातारा शहरामध्ये वाहतुक व्यवस्था सुरळीत व्हावी व वाहतुकीची कोंडी निर्माण होवु नये तसेच नागरीकांचे सुरक्षिततेस धोका पोहचू नये याकरिता वाहतूक नियंत्रण शाखा सातारा शहर कसूरदार वाहन चालक यांचेवर मोटार वाहन कायद्यान्वये करण्यात येणारे कारवाई वेळी तसेच शहरात रहदारीस अडथळा निर्माण करणारी तसेच नो पार्किंग मध्ये लावलेली वाहने, अपघात वाहाने, बेवारस वाहने क्रेनच्या (टो-गाडी) सहाय्याने टोईंग करणेसाठी वाहतूक नियंत्रण शाखा सातारा शहर येथे दोन क्रेन भाडेतत्वावर अटी व शर्ती करार ११ महिन्यांकरीता करून कार्यरत ठेवण्यात येणार आहेत.
अटी व शर्तीचे बाबतची माहिती नियंत्रण शाखा सातारा शहर कार्यालयात पाहणेस उपलब्ध आहे. इच्छुकांनी आपली दरपत्रके/निविदा बंद लखोटयात दिनांक ५ डिसेंबर २०२६ रोजी पर्यंत वाहतूक नियंत्रण शाखा सातारा शहर रविवार पेठ, सातारा येथे सादर करावीत, असे आवाहन सातारा शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी केले आहे.
सातारा शहर वाहतूक नियंत्रण शाखेसाठी क्रेन भाडेततत्वावर घेण्याबाबत आवाहन
by Team Satara Today | published on : 27 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा