सातारा : कोल्हापूर-पुणे महामार्गावर सातारा गावच्या हद्दीतील शिवराज तिकाटणे येथील ब्रिजवर पार्किंग लाईट व रिफ्लेक्टर न लावता धोकादायक स्थितीत उभ्या केलेल्या पुलर एक्सल गाडीला मोटारसायकल धडकल्याने तरुण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात लालमन रामसन्नी यादव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलर एक्सल गाडी क्रमांक एल. 06 ए. 6622 ही मंगेश स्क्रॅप दुकानासमोर पार्किंग लाईट व रिफ्लेक्टर न लावता धोकादायक स्थितीत उभी करण्यात आली होती. त्याचवेळी फिर्यादी संतोष बापूसो चव्हाण यांचा मुलगा श्रेयस हा मोटारसायकल क्रमांक एमएच. 50 जे. 5747 वरून जात असताना त्याची गाडी पुलर एक्सलला पाठीमागून धडकली.
या अपघातात श्रेयसच्या दोन्ही हातांना तसेच उजव्या मांडीला गंभीर दुखापत झाली. वाहनचालकाने निष्काळजीपणे वाहन उभे केल्यामुळे हा अपघात झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना दि. 28 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास कोल्हापूर ते पुणे जाणार्या हायवे रोडवर सातारा हद्दीतील शिवराज चौक येथील ब्रिजवर घडली.
याप्रकरणी संतोष बापूसो चव्हाण (वय 48, रा. पेरले, ता. कराड, जि. सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून लालमन रामसन्नी यादव (वय 51, रा. भांडुप पश्चिम, मुंबई) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करीत आहेत.
सातारा हद्दीतील शिवराज चौक येथील ब्रिजवर उभ्या गाडीला मोटारसायकलची धडक; तरुण गंभीर जखमी
by Team Satara Today | published on : 29 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा