खिदमत ए खल्क संस्थेचे कार्य आदर्शवत

by Team Satara Today | published on : 14 October 2025


सातारा : धर्म, जात, पंथ, भाषाद्वेष सारे संपू दे, माणसाने माणसाशी मानसासम वागावे, या उद्देशानुसार खिदमत ए खल्क संस्थेचे कार्य आदर्शवत ठरले आहे. जिल्ह्यातील सातारा शहरातून सुरू झालेल्या खिदमत ए खलकने समाजसेवेच्या कार्यातून आपली वेगळी ओळख जिल्ह्यासह राज्यभरात निर्माण केली.

कोरोना काळात सर्व नाती संपत चालली होती. त्यावेळेस माणुसकीच्या नात्याने खिदमत ए खल्क संस्थेने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले. यामध्ये प्रामुख्याने विविध पातळीवर कार्य करणाऱ्या सर्वधर्मीय कोरोनाबाधितांचे व इतर संलग्न आजारांनी मृत व्यक्तींच्या मृतदेहांचा अंत्यविधी करण्यासाठी साताऱ्यातील खिदमत ए खल्क या कमिटीचे सदस्य पुढे आले आणि अनेकांनी त्यांचे हे जीवघेणे कार्य पाहिले. कोरोनाग्रस्तांचे अंत्यसंस्कार करण्याचे काम मोठ्या धाडसाने या संस्थेच्या सदस्यांनी केले. त्यांचे हे कार्य सर्वांपुढे आदर्शवत तर ठरलेच; पण त्यातून माणुसकीचे दर्शन घडले.

पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये संस्थेचा कायम सहभाग असतो. गेंडामाळ कब्रस्तानच्या प्रांगणात १५ फळझाडांचे रोपण, किल्ले अजिंक्यतारा येथे वृक्षारोपण असे विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून वृक्षसंवर्धनाला महत्त्व दिले. सण, उत्सवकाळात बंदोबस्तावरील पोलिसांसमवेत संस्थेचे सदस्य सण, उत्सव साजरे करीत असतात. ईद व अन्य सणांच्या दिवशी बंदोबस्तावरील पोलिसांना गोडधोड वाटप करण्यात येते. लकडी पूल येथे प्रजासत्ताक दिनही साजरा केला.

खिदमत ए खल्क ठेकेचे कार्य सादिक शेख, साजिद शेख, मुबिन महाडवाले यांचे मार्गदर्शन हाजी मोहसीन बागवान, इम्रान सुमो, अज्जू घड्याळवाले, तौसिफ बागवान, अब्दुल सुतार, हाजी सलीम भारत हाजी अमजद भारत, असिफ खान, असिफ फरास, इशाद शेख, इशाद बाग हाफीज मुरा बागवान, अरबाज बागवान, सुहेल सय्यद, शाहरुख शेख, आबिद बागवान, शमशुद्दीन, आफताब, अय्याज, फज मोहम्मद, अयान फरान खान समाजसेवेचे हे कार्य नेत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साहित्य संमेलन विद्यार्थ्यांना दिशा देईल
पुढील बातमी
'अभंग तुकाराम’ चित्रपटाचा संगीत सोहळा संपन्न

संबंधित बातम्या