सातारा : बोगदा ते शेंद्रे दरम्यान झालेल्या ॲम्बुलन्स अपघातात एक ठार, तर दोन महिला जखमी झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 मे रोजी बोगदा ते शेंद्रे रस्त्यावरील सोनगाव गावच्या हद्दीत अजय अशोक शिवदास रा. एहसास मतिमंद मुलांचे बालगृह वळसे, ता. सातारा याने त्याच्या ताब्यातील ॲम्बुलन्स क्र. एमएच 11 डीडी 9352 बेदरकारपणे, भरधाव वेगाने चालवून रस्त्यालगत असलेल्या ओढ्यात ॲम्बुलन्स पाडून अपघात केला. या अपघातात ॲम्बुलन्स मधील दोन महिला जखमी झाल्या आहेत, तर अजय शिवदास याचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.