जलमंदिर पॅलेसमध्‍ये जयकुमार गोरेंचे खासदार उदयनराजेंसमवेत गुफ्तगू; मतांच्‍या बेरजेसाठी तासभर चर्चा

by Team Satara Today | published on : 31 October 2026


सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांत खलबते सुरू आहेत. आज ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांत निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांवर तासभर चर्चा झाली.
जिल्हा बॅंकेच्या मतदानासाठी केवळ एक दिवस उरला आहे. त्यामुळे मतांची बेरीज करून सेफ होण्यासाठी सर्वच प्रमुख लढती असलेल्या नेत्यांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांची मंत्री जयकुमार गोरे यांनी आज भेट घेतली.
यावेळी आमदार धैर्यशील कदम, महायुती समन्वयक सुनील काटकर, विराज शिंदे, विठ्ठल बलशेटवार, विनीत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली. मंत्री गोरे यांनी मतांच्या बेरजेसाठी ही भेट घेतल्याची चर्चा रंगली होती.
निदान भत्ता तरी चालू ठेवा...
जिल्हा बॅंकेच्या कार्यकारी समितीची सभा आज झाली. या सभेसाठी खासदार उदयनराजे भोसले उपस्थित राहिले. संचालक मंडळाच्या सभागृहात गेल्यावर ते थेट अध्यक्षांच्या खुर्चीत जाऊन बसले. त्यावेळी सर्व संचालकांच्या उपस्थितीत खासदार उदयनराजेंनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांना ‘निदान आमचा भत्ता तरी चालू ठेवा,’ असे म्हणताच एकच हशा पिकला. यावेळी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष अनिल देसाई, प्रभाकर घार्गे, दत्तानाना ढमाळ, प्रदीप विधाते, शिवरूपराजे खर्डेकर, राजेंद्र राजपुरे, कांचन साळुंखे, ऋतुजा पाटील, तसेच संचालक व अधिकारी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्‍या पाठपुराव्‍याने सातारा मेडिकल कॉलेजच्‍या यंत्रसामुग्री खरेदीसाठी १३.५० कोटी मंजूर
पुढील बातमी
दिवाळीच्या सुट्यांमध्ये वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन लालपरीच्या जादा फेऱ्या; मुंबई विभागाचा मोठा निर्णय

संबंधित बातम्या