प्रजासत्ताक दिनाची शालेय सुट्टी रद्द

राज्य सरकारचा निर्णय

पुणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी 26 जानेवारीला राज्यातील शाळांमध्ये सुट्टी दिली जाते. पण आता ही सुट्टी रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याऐवजी शाळा प्रशासनाने शाळेत देशभक्ती पर कार्यक्रमांचं आयोजन करावं आणि विद्यार्थ्यंमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करावी, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे यावर्षीपासून महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाची सुट्टी मिळणार नाही.

26 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशात सर्वत्र शालेय विद्यार्थ्यांना सार्वजानिक सुट्टी दिली जाते. सकाळी शाळेत झेंडा वंदन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सुट्टी दिली जाते. मात्र, आता यापुढे शालेय विद्यार्थ्यांना ही सुट्टी मिळणार नाही. महाराष्ट्र सरकारने प्रजासत्ताक दिनाची सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी कोणते कार्यक्रम घ्यावेत, यासाठी आठ स्पर्धा आणि कार्यक्रमांची यादी देण्यात आली आहे.

त्यामध्ये ध्वजारोहणानंतर नृत्य, चित्रकला, निबंध, प्रभातफेरी, वक्तृत्व स्पर्धा, कविता स्पर्धा आणि क्रीडा स्पर्धा आणि प्रदर्शन यांचा समावेश करण्यात आला आहे. हे सगळे कार्यक्रम देशभक्तीपर थीमवरच असावेत, असं पत्रकात म्हटलं आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांना निर्देशाची अंमलबजावणी करावी लागणार आहे.

विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याऐवजी शाळा प्रशासनाने शाळेत देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन करावं आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करावी, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे यावर्षीपासून महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाची सुट्टी मिळणार नाही. याऐवजी त्यांना शाळेतील विविध कार्यक्रमांना आणि स्पर्धांना उपस्थित राहावं लागणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी एक परिपत्रक जारी करून सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना प्रजासत्ताक दिनी शाळेत दिवसभर देशभक्ती थीमसह विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. 26 जानेवारीच्या दिवशी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राचा इतिहास, आपली महान संस्कृती आणि देशाचे भविष्य याबद्दल राष्ट्रीय अभिमानाची भावना निर्माण केली पाहिजे, असा यामागचा उद्देश असल्याचे सांगितले आहे.

मागील बातमी
समाजसेवक नाहटांच्या स्मरणार्थ 25 रुपयांचे नाणे
पुढील बातमी
अभय योजनेला ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ

संबंधित बातम्या